Pradeep Purnekar: शिवसेना नेते प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचे मुलानं सादर केले पुरावे? पत्रकार परिषदेत थेट फोटोच दाखवले

Pradeep Purnekar Murder Case: ठाण्यातील ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. पूर्णेकरांचा मुलगा राम पुर्णेकर यानं पत्रकार परिषद घेत काही पुरावे समोर आणले आहेत.
Ram Purnekar Son of Late Shivsena Leader Pradeep Purnkekar
Ram Purnekar Son of Late Shivsena Leader Pradeep PurnkekarRam Purnekar Son of Late Shivsena Leader Pradeep Purnkekar
Published on: 
Updated on: 

Pradeep Purnekar Murder Case: ठाण्यातील ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. पूर्णेकरांचा मुलगा राम पुर्णेकर यानं पत्रकार परिषद घेत काही पुरावे समोर आणले आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यानं आरोपींचे काही फोटो यावेळी दाखवले. पण तरीही अद्याप पोलिसांकडून योग्य प्रकारे कारवाई होत नसल्याचा आरोप राम पूर्णेकर यानं केला आहे.

यावेळी राम पूर्णेकर यानं एक फोटो दाखवला तो आरोपी कदम याचा असल्याचा त्याचा दावा आहे. हा व्यक्ती राजेंद्र शिंदे यांच्यासोबतच असतो, या कदमच्या कुटुंबानं तीन वर्षापूर्वी पूर्णेकर कुटुंबियांच्या घराशेजारीच भाड्यानं घर घेतलं होतं. पण तो आता गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या कुटुंबासोबत राहत नाही. पण अशा प्रकारे आमच्या कुटुंबावर लक्ष ठेवण्यासाठीच ते जवळ राहायला आले होते का?" असा संशय राम पूर्णेकरनं व्यक्त केला आहे.

Ram Purnekar Son of Late Shivsena Leader Pradeep Purnkekar
Manoj Jarange: जरांगे आता थेट भिडणार? एकनाथ शिंदेंवर पुन्हा केले गंभीर आरोप; 500 कोटींच्या आरोपांचे पुरावे देणार

त्याचबरोबर दुसरा आरोपी निखिल यादव याचा फोटोही राम पूर्णेकरनं पत्रकार परिषदेत दाखवला, या फोटोत यादव हा राजेश शिंदेच्या हातात बंदुक देत असल्याचं दिसत असल्याचा दावाही त्यानं केला आहे. आणखी एक व्हिडिओ आहे ज्यात राजेंद्र शिंदे हा निखिल यादव याला बंदुक चालवायची कशी? हे शिकवत असल्याचा दावाही त्यानं केला आहे. मी पत्रकार परिषदेत दाखवलेले हे फोटो आणि व्हिडिओ पुरावे तरी पोलिसांना आरोपींना पकडायला कामी येतील का? याद्वारे तरी माझ्या वडिलांना न्याय मिळेल का? असा सवाल यावेळी राम पूर्णेकरनं उपस्थित केला आहे. मला पोलिसांवर विश्वास आहे पण, हे सरकारवर या दोन आरोपींसाठी दबाव आहे, असा आरोपही यावेळी राम पूर्णेकरनं केला.

Ram Purnekar Son of Late Shivsena Leader Pradeep Purnkekar
Eknath Shinde News: जरांगेंकडून '500 कोटींचा खळबळजनक आरोप, दसरा मेळाव्यात चकार शब्द नाही, एकनाथ शिंदेंचं थेट दिल्लीतूनच मोठं विधान

"मला वडिलांनी या राजकारणापासून कायम दूर ठेवलं, तुला कोणी मारलं तर तू ही त्याला मारावं असंही शिकवलं नाही. त्यामुळं मला संविधानानुसारच न्याय मिळेल असा विश्वास आहे," असंही यावेळी राम पूर्णेकर यानं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com