Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Pradeep Purnekar murder case : पूर्णेकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; आदित्य ठाकरे, संजय राऊत ठाण्याच्या दिशेने रवाना

Thane Firing Case News : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांंच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे येत्या याकाळात हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : ठाण्यात मंगळवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर 5 राऊंड फायरिंग करून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण ठाणे हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला तब्यत घेतले तर फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या घटनेनंतर मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर सायंकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे दोघेजण ठाणे येथे जाऊन पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे समजते. पूर्णेकर यांंच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे येत्या याकाळात हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

ठाण्यातील ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) विभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांंच्या हत्येनंतर ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कुटुंबाने पूर्णेकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पूर्णेकर यांंच्या हत्येनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांची तातडीची बैठक मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी बोलवली आहे तर दुसरीकडे बुधवारी सायंकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत ठाण्याला रवाना झाले आहेत. हे दोघेजण पूर्णेकर यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

आरोपींच्या अटकेसाठी पाच तासांपासून ठिय्या

दुसरीकडे ठाण्यातील शिवसैनिकांसह नेतेमंडळी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच आरोपींच्या अटकेसाठी पाच तासांपासून ठिय्या मांडला आहे. पोलीस स्टेशनसमोर ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे व केदार दिघे हे ठाण मांडून बसले आहेत.

ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली? हे जरी स्पष्ट नसलं तरी यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत, ज्यामध्ये राजकीय वचर्स्व, विविध प्रोजेक्टमधील आर्थिक व्यवहार ही काही कारणं त्यामागे असल्याची चर्चा आता सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT