Supriya Sule  Sarkarnama
मुंबई

NCP Working President: राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्तीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.

सरकारनामा ब्यूरो

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पक्षाचे आभार मानले आहेत. "पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

काय आहे सुप्रिया सुळे यांचं ट्वीट?

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे, ते यापुढेही कायम राहिल, हा विश्वास आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार", असा शब्दात सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आभार मानले आहेत.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आता गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पक्षाचे आभार मानले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT