Prafulla Patel on Working president: राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले....

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.
Prafulla Patel on Sharad Pawar
Prafulla Patel on Sharad PawarSarkarnama

Prafulla Patel on Working president: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यांच्या या निर्णयावर नवे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

''पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणं आणि पक्षाला यशाच्या शिखरावर नेणं ही माझी पहिली जबाबदारी असेल. माझ्यासाठी कुठलीही जबाबदारी नवीन नाही. मी साहेबांसोबत राष्ट्रीय पातळीपर्यंत काम केलं आहे. पण साहेबांनी जी जबाबदारी दिली ती आतापर्यंत पार पडली. यापुढेही ती जबाबदारी पार पडत राहणार. सोबत सुप्रिया ताईलाही (Supriya Sule) घेऊन काम करणार आहे. नवीन नेतृत्त्व तयार करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मला साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचं काम करत राहणार. आम्हाला यश मिळणार."

Prafulla Patel on Sharad Pawar
BJP HighCommand suggestion to shinde : मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘त्या’ पाच मंत्र्यांना वगळा;भाजप हायकमांडच्या सूचनेने मुख्यमंत्री पेचात

या नव्या जबाबदारी सह सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा महाराष्ट्रातील निवडणुकांचीही जबाबदारी देण्यात आली आहे, तर पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, गोवा, गुजरात या राज्यांचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या अजित पवार यांच्याकडे कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. (Maharashtra Politics)

Prafulla Patel on Sharad Pawar
Sharad Pawar News : सर्व विरोधी पक्ष बिहारमध्ये एकत्र येणार; शरद पवारांनी वाढवलं भाजपचं टेंशन!

गेल्या महिन्यात लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीत त्याचे पडसाद उमटले होते, तेव्हा पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा होती. पवार यांच्या घोषणेनंतर आज सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com