Praful Patel Sarkarnama
मुंबई

Praful Patel CBI Clean Chit : प्रफुल पटेलांना सर्वात मोठा दिलासा; भ्रष्टाचार प्रकरणी CBI ची क्लीन चिट, क्लोजर रिपोर्ट दाखल...

CBI Closed Corruption Case Against Praful Patel : भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. त्यानंतर त्यांना वर्षभराच्या आतच दिलासा मिळाल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Chetan Zadpe

Mumbai News : सीबीआयकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पटेल यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने आता क्लोजर रिपोर्ट दाखल करत पटेल यांच्यावर कारवाईची टांगलेली तलवार दूर केली आहे. भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर वर्षभराच्या आतच हा क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्याने आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Praful Patel Marathi News)

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते प्रफुल यांच्याशी संबंधित प्रकरण हे सीबीआयडे प्रलंबित होते. मागील सात ते आठ वर्षांपासून सीबीआयकडून याबाबत तपास केला जात होता. मागील सात वर्षांपासून कोणताही दिलासा पटेलांना मिळाला नव्हता. पण आता त्यांना सीबीआयने क्लीन चिटन दिली आहे. सीबीआयने याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणताही पुरावा प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याविरोधात सापडले नसल्याचे सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. 2017 मध्ये पटेलांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मंत्रिपदावर असताना प्रफुल पटेल यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा हा कथित आरोप होता. तेव्हापासून सीबीआयची चौकशी आणि या प्रकरणी तपास सुरू होता. मात्र आता हा मोठा दिलासा पटेल यांना मिळाला आहे.

भाजपसोबत सत्तेत सामील -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजपबरोबर पटेल सत्तेत सामील झाले. त्यानंतर त्यांना वर्षभराच्या आतच दिलासा मिळाल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT