Ambadas Danve On BJP : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंचवीस टक्के दुसऱ्या पक्षातून आलेले... दानवेंचा टोला

Chhatrapati Sambhajinagar On BJP News : शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यानी भाजपला टोला लगावला आहे. प्रचारकांच्या यादीत पंचवीस टक्के दुसऱ्या पक्षातून आलेले...
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपने आपल्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह देशभरातील भाजपच्या अनेक केंद्र आणि राज्यातील नेते, मंत्र्यांची नावे आहेत. या यादीवरून शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यानी भाजपला टोला लगावला आहे.

वैचारिक दिवाळखोरी निघाली की, असले निर्णय घेतले जातात, अशी टीका करत त्यांनी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत (BJP star campaigners) 25 टक्के लोक हे बाहेरच्या पक्षातून आलेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधत सोशल मीडियावर पोस्ट केली. वैचारिक दिवाळखोरी आली की, असले निर्णय घेतले जातात. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या दहामध्ये पाच नावे भाजप (BJP) नेत्यांची आहेत.

Ambadas Danve
Lok Sabha Election 2024 : 'मजलिस को उखाड फेको' म्हणणाऱ्या अमित शाहांना उमेदवार मिळेना; जलील यांनी डिवचलं!

तर एकूण यादीत 25 टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या, उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. मोडेन पण वाकणार नाही, हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो. यांचा कारभार उलटा आहे. 'वाकेन पण मोडणार नाही'!, असा चिमटाही दानवे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून काढला आहे.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अंबादास दानवे यांच्याऐवजी उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली. खैरे-दानवे यांच्यात उमेदवारीवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दानवे यांनी आपण खैरेंचे नाही तर पक्षाचे काम करणार असल्याचे सांगत आपली नाराजी व्यक्त केली.

दुसरीकडे त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चा अजूनही सुरूच आहेत. दानवे यांनी स्वतः मला दररोज शिंदे गटाकडून पक्षप्रवेशासाठी विचारणा करणारे फोन येत असल्याची कबुली दिली होती. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी स्टार प्रचारकांच्या यादीवरून भाजपला टार्गेट करत आपल्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चेची धार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

R

Ambadas Danve
Sanjay Jadhav News : परभणीत संजय जाधवांना तिसऱ्यांदा उमेदवारी, मात्र हॅटट्रिकची वाट बिकटच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com