Praful Patel addresses the media after dismissing reports of his appointment as NCP national president following comments by Union Minister Piyush Goyal. Sarkarnama
मुंबई

NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, "सर्वांच्या भावना आणि इच्छांचा..."

Praful Patel on Piyush Goyal Statement : "राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी उत्तम आहे. राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व आधी अजित पवारांकडे आणि आता सुनेत्रा पवारांसोबत आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे."

Jagdish Patil

Mumbai News, 01 Feb : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल यांची नियु्क्ती केल्याचं वक्तव्य भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

पियुष गोयल यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कारण विरोधकांकडून खासकरून ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्याकडून राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील करा पटेल नको, असं म्हटलं जात असतानाच गोयल यांनी केलेल्या घोषणेमुळे चर्चांना उधाण आलं होतं.

मात्र, आता या सर्व चर्चांवर खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाल्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एक्सवर एक पोस्ट शेअर करत पटेल यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबाबतच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित होत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं आहे. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की, या बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये काहीही तथ्य नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इतक्या मोठ्या निर्णयासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि आमदारांशी चर्चा केली जाईल, तसंच आमच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल आणि पक्षाच्या सदस्यांच्या भावना आणि सर्वांच्या इच्छेचा आदर ठेवून निर्णय घेतला जाईल. एक राष्ट्रीय पक्ष असल्याने, आम्ही अशा निर्णयांसाठी ठराविक प्रक्रियेंचे पालन करतो.', असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती अद्याप झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पियुष गोयल नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, पीटीआयशी बोलताना पियुष गोयल म्हणाले होते की, "राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी उत्तम आहे. राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व आधी अजित पवारांकडे आणि आता सुनेत्रा पवारांसोबत आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे आता पक्षाच्या विलीनि‍करणासाठी शरद पवारांना आमंत्रित करतील असं मला वाटत नाही. कारण जनतेचा विश्वास शरद पवारांनी गमावला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊनही त्यांचा पराभव झाल. मात्र, अजित पवार महायुतीत असते ते विजयाचा भाग असते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT