Ajit Pawar Meet Amit Shah Sarkarnama
मुंबई

Patel on pawar-Shah Meeting : प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान; आगामी विधानसभा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढवणार

Mahayuti News : महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन, सहकार्य करून काम करत आहोत

Vijaykumar Dudhale

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे अजिबात नाराज नाहीत. माध्यमांमध्ये आलेली बातमी चुकीची आहे. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही विधानसभेची आगामी निवडणूक लढविणार आहोत, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. (Praful Patel's explanation on Ajit Pawar-Amit Shah meeting)

राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार निधीवाटपावरून नाराज आहेत, त्यांनी अमित शाह यांची भेटी घेऊन आपली नाराजी व्यक्त केली, अशी चर्चा अजित पवार आणि केंद्रीय मंत्री शाह यांच्या भेटीनंतर राज्यात रंगली आहे. विरोधी पक्षाकडून त्याचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला जात आहे. त्यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार पटेल यांनी स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अजिबात नाराज नाहीत. पवार हे नाराज असल्याची चुकीची बातमी माध्यमांमध्ये आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला मी, अजित पवार आणि सुनील तटकरे गेलो होतो. राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची आम्ही अमित शाह यांना माहिती दिली आणि त्यावर चर्चा केली.

अजितदादांच्या नाराजीचा कुठलाही विषय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही विधानसभेची आगामी निवडणूक लढविणार आहोत, हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो. महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन, सहकार्य करून काम करत आहोत, असा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी केला.

काही लोकांना पोटदुःखी होत आहे, त्यांच्याकडून वारंवार अजित पवार यांच्या नाराजीची बातमी पसरवली जात आहे. अजित पवार हे नाराज आहेत, यावर कोणीही विश्वास ठेवू नये. मी जबाबदारीने सांगतो की, आमची अमित शाह यांच्यासोबत नाराजीसंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT