Rohit Pawar Secret Blast : रोहित पवारांचा गौप्यस्फोट; लोकसभेनंतर राज्यात मोठे राजकीय भूकंप होणार

Eknath Shinde & Ajitdada Group News : लोकसभेनंतर शिंदे गटातील काही आमदार भाजपमध्ये जातील. तसेच, अजित पवार गटातीलही काही आमदार लोकसभेनंतर भाजपमध्ये जाऊ शकतात.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal News : लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील काही आमदार भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहेत. लोकसभेनंतर राज्यात खूप मोठे भूकंप झालेले आपल्याला पाहायला मिळतील, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला. (Big political earthquake in the state after Lok Sabha Election : Rohit Pawar's secret blast)

आमदार रोहित पवार हे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी विविध विषयांवरील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी रोहित पवार यांनी शिंदे गट आणि अजितदादा गटातील आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठे भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar
Split in NCP : ऐंशी वर्षांच्या वडिलांना कोर्टात एकटं कसं जाऊ देईन?; न्यायालयीन लढाईवर बोलताना सुप्रिया सुळे भावूक

शिंदे गट आणि अजितदादा गटातील आमदारांबाबत रोहित पवार म्हणाले की, असा अंदाज आहे की, लोकसभेनंतर शिंदे गटातील काही आमदार भाजपमध्ये जातील. तसेच, अजित पवार गटातीलही काही आमदार लोकसभेनंतर भाजपमध्ये जाऊ शकतात. काही आमदार अजितदादांसोबत राहू शकतात आणि काही लोकांमधील आमदार आहेत, ज्यांना मारून मुटकून त्यांच्यासोबत नेले आहे, ते आमच्याकडे परत येऊ शकतात, पण लोकसभा झाल्यानंतर त्यांचा उपयोग भाजपला राहणार नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीवरही रोहित पवार यांनी खोचक टीका केली. अजित पवार हे स्वतः अर्थमंत्री आहेत. अर्थमंत्र्यांच्याच आमदारांना निधी मिळत नसेल, तर मग खरे अर्थमंत्री कोण आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. कुठेतरी महायुतीमध्ये वाद आहे, हे आपल्या सर्वांपुढे आलेले आहे. केंद्रातील नेत्यांशी चर्चा करून वाद मिटेल किंवा मिटणार नाही, हे माहिती नाही. पण लोकसभेपर्यंत भाजप हा शिंदे गट किंवा अजित पवार गटाचा वापर करून घेईल. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजप सवयीप्रमाणे या नेत्यांचे काय करेल, हा मोठा प्रश्न आहे, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar
Dispute In Mahayuti : महायुतीमध्येही बिनसलं; अजित पवार गट विकासनिधीवरून शिंदे गटावर नाराज, २१ नोव्हेंबरला बैठक

रोहित पवारांनी नितेश राणेंना दिल्या शुभेच्छा...

नितेश राणे यांच्या टीकेला त्यांच्याच मतदारसंघातील लोक गांभीर्याने घेत नाहीत, मग मी कशाला घ्यायचं. त्यांना काय बोलयाचे ते बोलू द्या. जेव्हा निवडणूक येईल, तेव्हा जनताच त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेईल; पण त्यांना मी शुभेच्छा देतो. कपडे बदलावे, तसे त्यांनी पक्ष आणि भूमिका बदलली. पूर्वीची आणि आताची त्यांची भाषणे कशी आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मंत्रिपदासाठी ते कायम देवेंद्र फडणवीस यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. ते माझे मित्र आहेत, मी त्यांना शुभेच्छा देतो की, तुम्ही तुमच्या नेत्याला खूप इम्प्रेस करा आणि मंत्रिपद मिळवा. आम्हाला लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवायचे आहेत. ते सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा टोलाही रोहित पवारांनी नितेश राणेंना लगावला.

Rohit Pawar
Maratha Reservation : सावंतांच्या कारखान्याकडून मिळालेली साखर रस्त्यावर ओतून केली होळी; भूम-परांड्यातील मराठा आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com