Pradnya Pawar : कोबाड गांधी लिखित आणि लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवादीत केलेल्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला राज्यशासनाकडून जाहीर झालेला पुरस्कार जीआर काढून अचानक अचानकपणे रद्द केला आहे. सरकारकडून पुस्तकाला जाहीर केलेला पुरस्कार परत मागे घेतल्याने, आता अनेक लेखकांकडून याचा निषेध केला जातोय. लेखिका व कवयत्री प्रज्ञा पवार यांनी याचा निषेध व्यक्त करत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
प्रज्ञा पवार यांनी राज्यसरकाला एक पत्र पाठवले आहे. ते म्हणतात, यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत कोबाड गांधीलिखित आणि अनघा लेले अनुवादित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला घोषित झालेला अनुवादित श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार आपल्याकडून जी. आर. काढून रद्द करण्यात आला आहे.
तसेच पुरस्कारासाठी पुस्तकाची शिफारस करणारी परीक्षण समितीदेखील आपण एकतर्फी बरखास्त केली आहे. यातून तज्ज्ञांच्या निवड समितीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाला आहे, अशी माझी धारणा आहे.याचा निषेध म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. मंजूर व्हावा ही विनंती.
या सोबतच साहित्यिक नीरजा यांनी देखील महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा. 'भुरा' या कादंबरीचे लेखक शरद बावीसकर यांनी राज्याने दिलेला पुरस्कार नाकारला आहे. तर लेखक आनंद करंदीकर यांनी 'वैचारिक घुसळण' या पुस्तकाला निश्चित झालेला पुरस्कार नाकारायचं ठरवलंय. पुरस्कार वापसीची आणि या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्याची मालिका वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.