Uddhav Thackeray News : घनसांवगी येथे नुकतेच ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. Shivsena उद्घाटन प्रसंगी ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या परिसंवादात अशोक चव्हाण, अंबादास दानवे यांनी देखील शिंदे-फडणवीस व केंद्रातील मोदी सरकावर तोंडसुख घेतले होते. त्यामुळे हे साहित्य संमेलन होते की? राजकीय सभा अशी टीका देखील झाली.
याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी घनसांवगी येथे मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील ओम शिवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलीत संजीवन समाधी ध्यान योगपीठाचे प्रमुख आयुर्वेदाचार्य कैलास महाराज हेमके यांची भेट घेतली होती. (Marathwada) या भेटीत ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराजांशी ध्यान, मनशांती व अध्यात्मीक विषयावर चर्चा केली. संजीवनी समाधी घ्यान योगपीठाच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रम व शिबिरांची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली.
यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे, संम्मेलनाध्यक्ष शिवाजीराव चोथे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सहा महिन्यांपुर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेना सोडून भाजपला जावून मिळाले. शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण राहते की जाते अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यासाठी न्यायालयात व निवडणूक आयोगाकडे लढा देखील सुरू आहे.
एकीकडे राजकीय लढाई तर दुसरीकडे संपत्तीची चौकशी करण्यासाठी याचिका अशा चोहोबाजूंनी संकटात सापडलेल्या ठाकरेंनी ध्यान, आणि मनशांतीचे महत्व जाणून घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे औरंगाबादेत सुरू असलेल्या तिसऱ्या ज्योतिष्य व वास्तू महाअधिवेशनात ज्योतीषाचार्य पांडव यांनी उद्धव ठाकरे यांना मानसिक त्रास होण्याची भविष्यावाणी केली. त्यामुळे खरचं मानसिक तणाव दूर कसा करावा, याच्या टिप्स उद्धव ठाकरेंनी आयुर्वेदाचार्य कैलास महाराज यांच्याकडून घेतल्या की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे,
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.