Devendra Fadnavis : Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar On Constitution : तुमचं वक्तव्य ही मोहन भागवतांची भूमिका आहे का? आंबेडकरांचा फडणवीसांवर पलटवार...

Chetan Zadpe

Mumbai News : देशाचं संविधान बदलण्यात येणार, या मुद्द्यावरून आता राजकीय घमासा घडून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाचा संविधान बदलण्याचा डाव सुरू आहे, अशा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक होऊन आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले होते, आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत, त्यामुळे त्यांना चांगलच माहिती आहे की, कुणाचाही बाप संविधान बदलू शकत नाही. मात्र, यावरून आता पुन्हा आरोप-प्रत्यारोप होत आहेत. (Latest Marathi News)

प्रकाश आंबेडकर यांनी आता फडणवीसांना जाहीर आवाहन केले आहे. आंबेडकर म्हणाले, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, 'संविधान बदलणार नाही' हे त्यांचं वक्तव्य हे सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य आहे का? हे त्यांनी जाहीर करावं. जोपर्यंत भागवत हे आरएसएसचे प्रमुख आहेत आणि जोपर्यंत ते याबाबत घोषणा करत नाहीत, फडणवीसांचं हे वक्तव्य खरं मानता येणार नाही. १९४६ ते १९५० पर्यंत आरएसएसने जे संविधानविरोधी वक्तव्य केलं आहे, त्याच्याशी आम्ही आता सहमत नाही, ते आम्ही नाकारतो, असे संघाने जाहीर केलं पाहिजे."

"देशामध्ये हिंदूंचं राज्य असूनही देशाला हिंदू असं संबोधित करावं, घोषित करावं, असा त्यांचा लढा चाललेला आहे. मी दुर्दैवाने असं म्हणेन, या लढ्यांचं असणारं गांभीर्य लोकांसमोर अजून आलेलं नाही. पुन्हा या देशात वैदिक परांपरा सुरू व्हावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. संविधान बदलणार अशीच त्यांची घोषणा असावी. यावर आरएसएस बोलत नाही, विश्व हिंदू परिषद नाही. मात्र, फडणवीस ज्यांना संघाच्या प्रांतप्रतिनिधीपर्यंत जाता आलं नाही, आज तेच म्हणत आहेत की संविधान बदलणार नाही. माझ्या अंदाजाने रस्त्यावरच्या माणसाने कितीही बोंबललं तरी त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे बॅरिस्टर आहेत. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे, संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाही बदलता येणे शक्य नाही. त्यामुळे हा फक्त चुनावी जुमला आहे. कोणाच्या बापालाही संविधान बदलणे शक्य नाही.आमच्यासाठी संविधान हे तितकंच महत्त्वाचे आहे. त्यामुळे संविधान कुणी बदलू शकत नाही, मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, पण निवडणुका होत असल्याने हे मुद्दे आता तुम्हाला वारंवार ऐकायला मिळतील. पण विरोधकांनी नवे मुद्दे शोधून काढायला हवेत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT