Prakash Ambedkar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar On Uddhav Thackeray : प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन; उद्धव ठाकरेंना, काँग्रेस नेत्याला निमंत्रण

Pahalgam Attack Prakash Ambedkar Uddhav Thackeray : प्रकाश आंबेडकर पहलगाम हल्ल्याच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. त्यांनी यामध्ये राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Roshan More

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर विरोधी पक्षांकडून ते सरकारसोबत असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकार जी कारवाई करेल त्याला आपला पाठींबा असल्याचे म्हटले. दरम्यान,दहशतवादी हल्ल्याचे भारताने संघटितपणे प्रत्युत्तर दिले पाहिजे. यासाठी दहशतवादाविरोधात कठोर आणि पारदर्शक कारवाईची मागणी करत प्रकाश आंबेडकर आज (शुक्रवारी) मुंबईतील हुतात्मा स्मारकावर प्रतिकात्मक निषेध आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनात राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना दिले आहे.

बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांना आंदोलनाचे निमंत्रण देताना तुमच्या उपस्थिती आणि आवाजाद्वारे आपण सरकारला पाकिस्तान व दहशतवादाविरोधात निर्णायक पावले उचलण्याची मागणी करूया, असे आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

मोदी पाकिस्तानचे चार तुकडे करतील

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामनातून मोदींचे समर्थन करण्यात आले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, मोदी जाता जाता पाकिस्तानचे चार तुकडे करून जातील. कारवाई करण्यासाठी लष्कराला अधिकार दिले मात्र कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तिची गरज असते. इंदिरा गांधींनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली त्यामुळेच पाकिस्तानचे दोन तुकडे होऊ शकले.

काँग्रेसचा कारवाईसाठी पाठिंबा

सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने पहलगाम हल्ल्याबाबत सरकारजी कारवाई करेल त्याला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले होती की, आम्ही सरकारसोबत आहोत. सरकार योग्य ती कारवाई करेल. मल्लिकार्जून खर्गे यांनी देखील आमचे सरकारला समर्थन असल्याचे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT