
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानावर कारवाई करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारताकडून कारवाईचे संकेत दिल्याने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये 57 मुस्लिम राष्ट्रांची संघटना असणाऱ्या ओआयसीने (ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) पाकिस्तानला साथ देण्याची घोषणा केली आहे. ओआयसीकडून (OIC) भारताकडून कारवाई हा शांततेसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.
न्यूयाॅर्कमध्ये OIC संघटनेच्या राजदूतांची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्ताने दक्षिण आशियाच्या शांततेबाबत मुद्दा उपस्थित केला. तसेच संयुक्त राष्ट्रामधील पाकिस्तानचे राजदूत आसिम इफ्तिखार अहमद यांच्याकडून भारत उचलत असलेले पाऊले ही राजकीय हेतुने प्रेरित आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी OIC संघटनेतील देशांना भारताच्या भूमिकेवर आणि त्याद्वारे होणाऱ्या परिणामांचा विचार करण्याचे आवाहन केले होते.
द एक्सप्रेस ट्रिब्यून या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, OIC च्या राजदुतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेला समर्थन असल्याचे म्हटले आहे. तसेच भारत पाकिस्तानामधील तणाव हा चर्चेच्या माध्यमातून कमी केला जावा तसेच काश्मीरच्या मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. संघटनेने आपण पाकिस्तानसोबत असल्याचेही म्हटले आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई जरूर करावी. पण युद्धाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
OIC मुस्लिम देशांची संघटनेची स्थापना 1969 मध्ये झाला. या संघटनेमध्ये आशिया, अमेरिका, आफ्रिका, युरोप खंडातील जवळपास सर्वच देशांचा समावेश आहे. सौदे अरेबिया, इराण, इराक, पाकिस्तान, बांग्लादेश, तुर्की, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, इजिप्त, लिबिया, सोमालिया, नायजेरिया, अल्बानिया अशा देशांचा यामध्ये समावेश आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात पाकिस्तानाला जाहीर इशारा दिला. ते म्हणाले की, हा मोदींचा भारत आहे. चुन-चुनकर मारेंगे. पहलगाम हल्ल्यानंतर ज्यांना वाटते आहे की हा त्यांचा विजय आहे त्यांना सोडले जाणार नाही. दहशतवाद मुळापासून संपवला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.