Aditya Thackeray On Ambedkar :  Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray On Ambedkar : आंबेडकरांची औरंगजेब कबरीवर फुलं वाहण्याची कृती; आदित्य ठाकरे म्हणाले..

Aditya Thackeray On Prakash Ambedkar : 'गद्दारांनी जागतिक गद्दार साजरा करावा.."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली. आंबेडकरांच्या या कृतीने मोठे राजकीय घमासान पाहायला मिळायला. शिवसेना ठाकरे गटासोबत आंबेडकर आघाडीत असल्याने भाजपने याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच, यावर आता ठाकरे गटाची भूमिका काय ? असा सवालही भाजपने उपस्थित केला. या सर्व घडामोडीनंतर आता आदित्य ठाकरे यांना याबाबत प्रतिक्रिया विचारले असता, त्यांनी यावर भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब कबरीला भेट दिली. कबरीवर फुलं वाहिली. याबाबत आदित्य ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आले असता ते म्हणाले, मला आताच माध्यमांकडून ही माहिती समजत आहे. मला याची सविस्तर माहिती घेऊ द्या, मगच मी त्यावर काही बोलू शकेन."

'जागतिक गद्दार दिवस साजरा करावा -

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, "शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आम्हीच साजरा करत आहोत. ज्यांची हकालपट्टी झाली आहे, सगळीकडून ज्यांना नाकारलं गेलंय, असा माल आमचा वर्धापन दिन कसा साजरा करू शकतो. अशा गद्दारांनी जागतिक गद्दार दिन साजरा करावा, कारण यांच्या गद्दारीची नोंद जगातल्या ३३ राष्ट्रांनी घेतली आहे. गद्दारीचा दिवस त्यांनी साजरा करावा, किती निर्लज्जपणे गद्दारी केली होती, हे या गद्दारांनी दाखवून द्यावं.”

महाशिबिराचे आयोजन -

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर आहे. या शिबिराची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या शिबिराला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल होत आहेत. याच कामाच्या पाहणीसाठी आदित्य वरळीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाध साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT