Ranchi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली आहे. 'मोदी आडनावा'वरुन टिका केल्याप्रकरणी राँची न्यायालयाने त्यांना आता शेवटचे समन्स पाठवले आहे.
याप्रकरणी राहुल गांधी यांना अनुपस्थितीत राहण्याबाबत त्यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. यावर न्यायालयाने ३ मे रोजी ही परवानगी नाकारली होती.
त्यावेळीही राहुल गांधी यांनी स्वतः उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पण ते उपस्थित राहिले नाहीत. आता या प्रकरणावर चार जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती. चार जुलै रोजी राहुल गांधी यांनी स्वतः न्यायालयात उपस्थित राहावे, असे समन्स न्यायालयाने त्यांना बजावले आहे.
सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं. त्यामुळे हा संसदीय समितीने त्यांची खासदारकी रद्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टिका केल्यामुळे राहुल गांधी यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे? असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन दिला होता.
प्रदीप मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात २३ एप्रिल २०१९ रोजी ही तक्रार केली आहे. त्यांची सुनावणी सध्या सुरु आहे. "राहुल गांधींना न्यायालयाने हे शेवटचे समन्स पाठवले असून ते जर न्यायालयात स्वतः उपस्थित राहिले नाहीत, तर न्यायालय त्यांच्याविरोधात कडक कारवाई करु शकते," असे प्रदीप मोदी यांच्या वकीलांनी माध्यमांना सांगितले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.