मुंबई : विधान परिषद निवडणूक (Legislative Council elections) निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. यात काँग्रेसचे (Congress) पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभूत झाले आहे. तर भाजपने उभे केलेले पाचही उमेदवार विजयी झाले आहे. यामुळे भाजप नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान या निवडणूकीत भाजपचे (BJP) पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी विजयानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोपटाचा गळा आता तर दाबायला पाहिजे, अश्या शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. (MLC Election 2022 Latest Marathi News)
भाजपच्या पहिल्या चार उमेदवारांमध्ये श्रीकांत भारतीय यांना ३०, राम शिंदे यांना ३०, प्रविण दरेकर यांना २९ तर उमा खापरे यांना २७ मत मिळाली. विजयाच्या २६ मतांचा कोटा वगळून यातील उर्वरित १२ मत दुसऱ्या फेरीत लाड यांना ट्रान्सफर झाली आणि त्यांनी २६ मतांचा आवश्यक कोटा पूर्ण करत विजय मिळवला.
पहिल्या फेरीत अक्षेप्रमाणे भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २ शिवसेनेचे (Shivsena) २ उमेदवार विजयी झाले. पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे विजयी झाले. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले.
तर काँग्रेसची ३ मत फुटल्याने त्यांचा पहिल्या फेरीत एकही उमेदवार विजयी होवू शकला नाही. पहिल्या फेरीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ मत मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मत मिळाली होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या मतमोजणीच्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांच्या मतपत्रिकेवर भाई जगताप यांना पसंती क्रम असल्याने त्यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला आला.
दरम्यान, लाड यांना पहिल्या फेरीत १७ मत मिळाली. तर दुसऱ्या फेरीत भाजपच्या पहिल्या फेरीतील १२ मत लाड यांना ट्रान्सफर झाल्याने लाड दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत. या विजयानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आता या पोपटाचा गळा दाबायला पाहिजे,असा इशारा त्यांनी दिला. तर माझ्याकडे कुठलेही मत नसतांना आपण हा विजय मिळवला असल्याचे लाडांनी म्हटले आहे. आपण हा विजय 29 मतांनी जिंकलो. देवेंद्र फडणवीस यांची जादू चालली, अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.