Pratap Sarnaik  sarkarnama
मुंबई

Pratap Sarnaik News : मेट्रोच्या पार्किंगसाठी आमदार मेहतांनी जागा द्यावी, मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Pratap Sarnaik Narendra Mehta : काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे काम थांबले आहे. हे काम पोलीस बंदीबस्तात तातडीने सुरू करण्याचे सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Pratap Sarnaik News : मीरा-भाईंदर मेट्रोचा काशीगाव ते दहिसर हा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. मेट्रोला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र त्यासोबतच काशीगाव मेट्रो स्थानकाजवळ पार्किंगची समस्या भेडसावू लागली आहे. या स्थानका लागतच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची जमीन आहे. त्यामुळे वाहनांचे पार्किंग करण्यासाठी मेहता यांनी आपली जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.

काशिगाव मेट्रो स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, अपूर्ण एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स आणि पार्किंगच्या  समस्येची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी (ता.11)  काशिगाव मेट्रो स्थानक परिसराची  पाहणी केली. तांत्रिक अडचणी आणि काही जागा मालकांच्या आडकाठीमुळे स्थानकाच्या ४ पैकी २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम प्रलंबित राहिले असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

काशिगाव मेट्रो स्थानकालगत ओसवाल बिल्डरच्या जमिनीच्या वादामुळे काम थांबले आहे. हे काम पोलीस बंदीबस्तात तातडीने सुरू करण्याचे सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आमदार नरेंद्र मेहता यांच्या  ७/११ कंपनीच्या मालकी जागेवरील  १३३ मीटर जागा मेट्रोच्या एन्ट्री-एक्झिट पॉईंट्ससाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, शहराच्या हितासाठी त्यांनी केवळ १३३ मीटर जागा न देता तो संपूर्ण भूखंडच 'पार्किंग प्लाझा'साठी एमएमआरडीएला हस्तांतरित करावा.

७/११ कंपनीने हा भूखंड दिला, तर त्या ठिकाणी सुमारे  १५०० ते २००० खाजगी वाहनांची सोय होईल असा प्रशस्त पार्किंग प्लाझा उभारता येईल. सामान्यांच्या सोयीसाठी मेहता यांनी आपला भूखंड  एमएमआरडीएला द्यावा. त्यांनी त्यासाठी हवे तर चालू बाजारभावाने   मोबदला घ्यावा पण त्याठिकाणी भव्य पार्किंग प्लाझा उभारून शहर कोंडीमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सरनाईक यांनी मेहता यांना केले आहे.

दरम्यान स्थानकापर्यंत येणाऱ्या नागरिकांना स्वत:चे वाहन पार्क करून निश्चिंतपणे प्रवास करता यावा अशी व्यवस्था आगामी दोन महिन्यात करण्याचे  निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT