NCP, BJP Sarkarnama
मुंबई

NCP VS BJP : ते जास्त वाटा मागतात मग, आमचे 105 आमदार; भुजबळांच्या दाव्यावर भाजपची नेमकी भूमिका काय?

Pravin Darekar Statement On Chhagan Bhujbal : महायुतीबाबत चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याने, विधानसभा निवडणुकीत भाजपने आमच्या पक्षाला जास्त जागा देण्याचा शब्द दिला होता, अशी जाहीर वक्तव्ये टाळावीत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात मोठ खटखट झाली. आता विधानसभेत तसे व्हायला नको. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत 80 ते 90 जागा मिळाव्यात, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित केले. त्यास अजित पवारांनीही दुजोरा देत त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावर भाजपनेही सावधपणे आपली भूमिका स्पष्ट करत त्यांच्या 105 आमदारांची आठवण करून दिली. यातून लोकसभेच्या निकालापूर्वीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेंच सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकरांनी Pravin Darekar भुजबळांच्या विधानावर सावध भूमिका घेत युतीत भाजप मोठा भाऊ असल्याची आठवण करून दिली. महायुतीबाबत चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याने, विधानसभा निवडणुकीत भाजपने आमच्या पक्षाला जास्त जागा देण्याचा शब्द दिला होता, अशी जाहीर वक्तव्ये टाळावीत, असा सल्ला दरेकरांनी दिला आहे.

पक्ष चालवताना कार्यकर्त्यांना हिंमत देणे, मनोबल वाढवणे महत्वाचे असते. त्या उद्देशाने जास्तीचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य भुजबळांनी केले असावे. त्यांना जास्त वाटा मागावासा वाटतो, मग भाजपचे BJP 105 आमदार आहेत. त्यांनी जास्त जागा का मागू नयेत? भुजबळांना वाटते तसे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला वाटते. त्यातून असणारी प्रचलित स्थिती, प्रत्येकाचे स्थान या सर्व गोष्टींचे अवलोकन करून निर्णय घ्यायचा असतो, याकडे दरेकरांनी भुजबळांचे Chhagan Bhujbal लक्ष वेधले.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी स्पष्ट सांगितले आहे की, भाजपा मोठा पक्ष आहे. समन्वयातून संतुलन साधूनच महायुतीत निर्णय होईल. तुलनात्मक जागा मोठ्या प्रमाणावर भाजपाला असतील. सहयोगी पक्षांचे कुठेही अवमूल्यन होणार नाही याची काळजी घेऊन त्यांचाही सन्मान केला जाईल, असेही दरेकरांनी यावेळी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमचाही मोठा पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत, तो नाराज झाला तर पक्षाची गती, वाटचाल यावर परिणाम होतो. असे असताना कुणीही बोलायचे आणि आम्ही गप्प बसायचे, हे चालणारे नाही. संविधानाच्या बाबतीत, भाजपने कशा भूमिका घेतल्या आहेत आणि काँग्रेसने किती वेळा संविधान बदलले हे जनतेला सांगितलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या शंका महायुतीतील भुजबळांसारख्या नेत्यांनी मांडायला नको, अशा सल्लाही दरेकर द्यायला विसरले नाहीत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT