Nandurbar Lok Sabha Analysis : मोदी लाटेशिवाय हिना गावित हॅटट्रिक करणार? काय सांगतात मतदानाचे आकडे...

Congress Vs BJP News : काँग्रेसने गोवाल पाडवी हा फ्रेश चेहरा दिला आहे. पाडवी यांच्यावर टीका करावा असा एकही मुद्दा भाजपकडे नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक अतिशय वेगळी ठरण्याची चिन्हे आहेत.
Narendra Modi, Heena Gavit
Narendra Modi, Heena GavitSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar Lok Sabha News : नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. हिना गावित यंदा हॅट्रिकसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र मोदी लाट नसताना त्या विजयी होतील का, हा प्रश्न सध्या साक्री विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहे.

नंदुरबार मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 मध्ये भाजपच्या डॉ. गावित यांनी तो मोदी लाटेत काबीज केला. गेल्या निवडणुकीतही हिना गावित दुसऱ्यांदा विजयी झाल्या. यंदा त्या तिसऱ्यांदा उमेदवारी करीत आहे. त्यांच्यापुढे काँग्रेसने गोवाल पाडवी हा फ्रेश चेहरा दिला आहे. पाडवी यांच्यावर टीका करावा असा एकही मुद्दा भाजपकडे नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक अतिशय वेगळी ठरण्याची चिन्हे आहेत.

साक्री विधानसभा मतदारसंघात यंदा दोन लाख 41 हजार 33 असे 67.60 टक्के मतदान झाले. मतदारांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रंग लावून अतिशय उत्साहात मतदान केले. साक्री Sakri परिसरातील अनेक समस्या गेल्या दहा वर्षात होत्या तशाच आहेत. त्यामुळे डॉ. गावित Heena Gavit यांना मिळालेला संसदरत्न पुरस्कार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन भाजपकडून करण्यात येत होते.

Narendra Modi, Heena Gavit
Prajwal Revanna News : प्रज्वल रेवण्णाने भारतात पाऊल ठेवताच..! ‘त्या’ व्हिडिओनंतर SIT लागली कामाला  

गेल्या दोन निवडणुकांमध्ये देशात पंतप्रधान मोदी Narendra Modi यांची लाट होती. यंदा तसे नाही पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामकाजाच्या आधारे भाजप मत मागत आहेत. त्यातील फोलपणा दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेसने यशस्वीपणे केला. प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा व तिला मिळालेला मोठा प्रतिसाद त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा स्थितीत दोन्ही तरुण उमेदवार मतदारांकडून काय प्रतिसाद मिळतो या प्रतीक्षेत आहेत.

Narendra Modi, Heena Gavit
Agitation For Sugarcane Rate : 'प्रहार'चा दणका; शेतकऱ्यांना 18 टक्के व्याजासह मिळणार थकीत पेमेंट

यंदाच्या निवडणुकीत शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय तीव्रतेने काँग्रेसच्या प्रचारात होते. आदिवासी येथे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात गुजरात मध्ये स्थलांतर करतात. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होऊन स्थलांतर थांबविण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. आदिवासींचा सर्वात मोठा अर्थसंकल्पातील हिस्सा नंदुरबार Nandurbar सारख्या भागाला मिळतो. डॉ. गावित यांच्या घरातच हे मंत्रीपद आहे. मात्र व्यक्तिगत लाभाच्या योजना व्यतिरिक्त परिसराच्या विकासाबाबत फारसे लक्ष दिले गेले नाही, अशी नाराजी मतदारांमध्ये आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे नेत्यांचा एक मोठा गट डॉ. गावित यांच्या उमेदवारीला विरोध करत आहे. या नेत्यांकडून निवडणुकीत वेळेचे डावपेच आखण्यात आले होते. अशा स्थिती मोदी लाट नसताना डॉ. गावित तिसऱ्यांदा संसदेत पोहोचतील का? याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

(Edited Sunil Dhumal)

Narendra Modi, Heena Gavit
Porsche Crash Case: ससूनच्या डॉक्टरांशी टिंगरेंचा काय संबंध? अंबादास दानवे म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com