Tukaram Mundhe_Preity Zinta 
मुंबई

Preity Zinta: अभिनेत्री प्रीती झिंटालाही तुकाराम मुंढेंच्या कामाची भुरळ! मुंढेच्या नावाचा मराठी कॅलिग्राफीचा टीशर्ट घालून अभिमानं मिरवलं

Preity Zinta fan of Tukaram Mundhe: तिच्या टीशर्टचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

Amit Ujagare

Preity Zinta fan of Tukaram Mundhe: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिला देखील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कामाची भुरळ पडली आहे. मुंढेंच्या नावाचा मराठी कॅलिग्राफी असलेला टीशर्ट परिधान करुन ती सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसली आहे. त्यामुळं तिच्या या टीशर्टचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रीती झिंटानं काळ्या रंगाचा टीशर्ट घातला असून यावर मराठी भाषेत आणि लाल रंगामध्ये टीम तुकाराम मुंढे असे शब्द लिहिलेले आहेत. विशेष म्हणजे हे वाक्य कॅलेग्राफीक फॉन्टमध्ये छापलेलं असून ते ठळकपणे लक्ष वेधून घेतं. या टीशर्टमध्ये दिसल्यानंतर अनेकांनी तिला या खास पेहरावाबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर देताना तिनं सांगितलं की, "या खऱ्या हिरोंना सिलेब्रेट करण्याची हीच वेळ आहे. खऱ्या लोकसेवकांना कुठल्याही चित्रपट प्रमोशन्सची गरज नाही. त्यांचं प्रामाणिक काम हेच त्यांचा स्वतःचा वलय निर्माण करतं"

दरम्यान, तुकाराम मुंढे हे एव्हाना सर्वांनाच परिचित झालेले बडे प्रशासकीय अधिकारी आहेत. कुठल्याही विभागात काम करताना आपल्या धडाकेबाज कामामुळं ते आपली ओळख निर्माण करत असतात. त्यांची ही कामाची पद्धत कोणाच्याही राजकीय दबावाला जुमानत नाही. त्यामुळंच सर्वसामान्य जनतेकडून त्यांच्या कामाचं भरभरुन कौतुक होतं असतं. यापूर्वी इतरही अनेक सेलिब्रेटिंनीही त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा आयुक्त म्हणून काम करत आहेत. त्यांनी या विभागाची जबाबदारी स्विकारल्यापासून केवळ ६ महिन्यांच्या आतच शेकडो प्रसिद्ध खाद्यपदार्थांची दुकान, दुध डेअरी आणि हॉटेल्स-रेस्तराँ तसंच औषध कंपन्या आणि त्यांच्या निर्मिती युनिट्सवर धाडी टाकून तिथं नियमाप्रमाणं आणि स्वच्छता न राखता काम होत असल्याचं निदर्शनास आल्यानं थेट त्यांचे परवानेच रद्द केले आहेत. त्यांमुळं अशा प्रकारे अन्न आणि औषधांसंबंधीच्या दुकानांनी बनावट किंवा कमी दर्जाचा माल नष्ट केल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT