जळगाव : राज्यातील सत्तातरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसीच्या मैदानावर ५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा (Dussehra Melava) होत आहे. ठाकरे गट, शिंदे गटासमोर दसरा मेळाळ्यात गर्दी जमविण्याचे आवाहन आहे. दोन्ही गटांनी मेळाव्यास गर्दी जमविण्यास कंबर कसली आहे.
दसरा मेळावा दणक्यात होण्यासाठी ठाकरे आणि शिंदे या सेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठी रस्सीखेच होणार असल्याची चिन्हे पदोपदी दिसत आहेत. दोन्ही गटाच्या बैठकामध्ये याबाबत नियोजन सुरु आहे.
या मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना गर्दी जमविण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खरी शिवसेना कुणाची याची कसोटी लावण्यासाठी कळीचा मुद्दा ठरणाऱ्या या मेळाव्यांमधील शक्ती प्रदर्शन ही उभय गटांची नितांत गरज ठरणार आहे. यासाठी आपापल्या भागातून अधिकाधिक गर्दी जमवण्याची जबाबदारी आता बंडखोर आमदारांनी घेतली आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्याला मुंबईला जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातूनच मुंबईकडे जाणाऱ्या ३ रेल्वेगाड्या बुक करण्यात येणार आहेत. शिंदे गटाकडून या प्रत्येक ट्रेनसाठी २५ लाख रुपये याप्रमाणे तब्बल ७५ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून मेळाव्यासाठी नागरिकांना आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.
दसरा मेळाव्याच्या दिवशी जळगाव, पाचोरा व मुक्ताईनगर येथून सकाळी कार्यकर्ते रेल्वेने मुंबईला मुंबईला जाणार आहेत. खासगी बस, कारनेही कार्यकर्ते, पदाधिकारी दसरा मेळाव्याला जाणार आहेत. शिंदे गटाकडून या प्रत्येक ट्रेनसाठी २५ लाख रुपये याप्रमाणे तब्बल ७५ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. मेळाव्यासाठी जळगावहून तीन रेल्वे मुंबईला रवाना होणार आहेत.
राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार शिंदे गटात जळगावातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह एरंडोलचे चिमणराव पाटील, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, पाचोऱ्याचे चंद्रकांत पाटील व चोपड्याच्या लता सोनवणे असे एकूण ५ आमदार आहेत. त्यांच्या प्रत्येक मतदारसंघातून मेळाव्यासाठी नेण्याच्या “गर्दी’चे नियोजन झाले आहे.
शिवसेनेला शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेता येईल की नाही, या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. बीएमसीच्या जी नॉर्थ वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसीच्या ग्राऊंडवर मेळाव्याच्या तयारीस सुरवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.