पालघर : शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतरही शिवसेनेची गळती थांबलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे. शाखाप्रमुख, आमदार, खासदार यांनी शिंदे गटात सामील होत आहेत. (Shivsena Crisis Latest News)
पालघर (Palghar) जिल्ह्यातील शिवसेनेच्या (shiv sena) दोन माजी आमदारांनी शिवसेनेला 'जयमहाराष्ट्र' करुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश न करता थेट भाजपात प्रवेश केल्याने हा शिंदे गटालाही मोठा धक्का असल्याचं बोललं जातयं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन माजी आमदारांनी अचानक भाजपात प्रवेश केल्याने पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार पडलं आहे.
अमित घोडा आणि विलास तरे अशी भाजपात (BJP) प्रवेश करणाऱ्या दोन माजी आमदारांची नाव आहेत. विलास तरे हे शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते बहुजन विकास आघाडी मधून सन २००९ व २०१४ मध्ये बोईसर मतदार संघातून आमदार झाले होते. शिवसेनेतून २०१९ विधानसभा निवडणूक लढवताना त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेमधून निवडणूक लढवताना त्यांना अंतर्गत विरोध झाला होता. ते शिवसेनेत अस्वस्थ होते.
राष्ट्रवादी मधून पक्षांतर करून शिवसेनेत गेलेल्या कृष्णा घोडा यांचे २४ मे २०१५ रोजी निधन झाल्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव अमित घोडा विजयी झाले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली. शिवसेनेने सन २०१९ मध्ये त्यांना तिकीट नाकारून त्यांचे ऐवजी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती. आपल्या भागातील विकास कामे होत नसल्याने तसेच आपल्याला पक्ष संघटनेने विश्वासात घेतले नसल्याने आपण पक्षांतर केल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.