Praful Patel, Prithviraj Chavan
Praful Patel, Prithviraj Chavan sarkarnama
मुंबई

Prafull Patel यांच्या मदतीला आले पृथ्वीराज चव्हाण... त्यांना बदनाम करू नका!

Umesh Bambare-Patil

मुंबई : जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) भारताच्या फुटबॉल संघटनेचे सदस्यत्व रद्द केले आहे. ही अत्यंत धक्कादायक बाब असून याबाबत केंद्रीय क्रिडा मंत्र्यांनी याचा खुलासा करून जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी. तसेच कारण नसताना प्रफुल्ल पटेल यांना दोषी धरता येणार नाही. त्यांनी चांगले काम केलेले असून केवळ धुसफुस करून त्यांचे नाव बदनाम करणे योग्य नाही. सर्व जबाबदारी केंद्रीय क्रिडा मंत्रालयाचीच आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रफुल्ल पटेल यांची पाठराखण केली आहे.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय क्रिडा मंत्रालयावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) भारताच्या फुटबॉल संघटनेचे सदस्यत्व रद्द केले आहे. ही अत्यंत धक्कादायक बाब असून एका बाजूला भारतीय क्रिडापट्टूंनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत चांगले काम केलेले आहे. एकीकडे फुटबॉल स्पर्धेचा दर्जा वाढत असून आता कुठे आपली फुटबॉल पट्टू आंतरराष्ट्रीय जगतात यायला सुरवात झाली होती. त्यातच ही धक्कायदाक बातमी पुढे आली आहे.

अशा पध्दतीने भारतीय संघटनेला निलंबित केल आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही वैश्वविक फुटबॉल स्पर्धा आपल्या देशात होणार नाहीत. ज्या स्पर्धा होऊ घातलेल्या आहेत, त्याही स्थगित केल्या आहेत. केंद्रीय क्रिडा मंत्र्यांनी याबाबत खुलासा द्यावा. यासाठी कोण जबाबदार आहे, हा निर्णय का घेतला गेला. तसेच जबाबदार व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे.

केंद्रीय क्रिडा मंत्रालयाचे भारतीय फुटबॉल संघावरील नियंत्रण कमी पडले आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर करवाई करून ही परिस्थिती बदलली पाहिजे. पुन्हा एकदा भारतीय फुटबॉल संघाला जागतिक फुटबॉल संघटनेचे सदस्यत्व मिळाले पाहिजे. यातून भारतीय फुटबॉल संघाला बळकटी मिळेल.

यासंदर्भात कोणावर ही दोषारोप करता येणार नाही. केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने सांगितले पाहिजे. कारण नसताना कोणाला ही दोषी धरता येणार नाही. प्रफुल्ल पटेल यांनी चांगले काम केलेले आहे. केवळ धुसफुस करून त्यांचे नाव बदनाम करणे योग्य नाही. सर्व जबाबदारी केंद्रीय क्रिडा मंत्रालयाचीच आहे. फुटबॉल स्पर्धा व त्याचा स्तर वाढत चालला असतान या निर्णयामुळे फुटबॉल संघातील खेळाडूंची घोर निराशा झाली आहे.

कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत भारताच्या क्रिडापट्टूंनी नेत्रदीपक काम केलेल आहे. एका एका खेळाडूने दोन दोन पदके मिळविली असून यापूर्वी असे कधी घडले नव्हते. राज्यांच्या क्रिडापट्टूने चांगले काम केलेले आहे. त्यामुळे फुटबॉल संघावर आक्षेप घेणे ही धक्कादायक बाब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT