Anand Dighe Death Enquiry:  Sarkarnama
मुंबई

Anand Dighe's Death Enquiry: आनंद दिघेंच्या मृत्यूची चौकशी करा: शिंदे गटाच्या नेत्याची मागणी

Anand Dighe Death Enquiry: आजही ठाण्यातील प्रत्येक घरात आनंद दिघे यांना दैवत मानलं जातं.

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Shirsat on Anand Dighe: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा अनेकांना संशय आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

"आजही ठाण्यातील प्रत्येक घरात आनंद दिघे यांना दैवत मानलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी ठाण्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील इच्छा आहे.", असंही शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटलं आहे. आनंद दिघेंचा अपघात झाला नसून त्यांचा खून झाला होता. एका दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. पण एक दिवस आधीच अचानक असं काय घडलं ज्यामुळे आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला, यामागचं सत्य समोर आलं पाहिजे, अशी मागणीही शिरसाट यांनी यावेळी केली.

आजही ठाणेकरांच्या मनात आनंद दिघे (Anand Dighe) यांची आठवण आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील आनंद दिघेंचे कट्टर शिवसैनिक आहे म्हणून दिघे यांचा आश्रम सुसज्ज असा केलेला आहे. जे दिघे साहेबांच्या अंत्यविधीला नव्हते, ते देखील आज त्या आश्रमात जाऊन डोकं टेकवतात. प्रॉपर्टी बळकावणं हा तुमचा धंदा असेल, अशी टीकाही शिरसाटांनी केली आहे.

संजय शिरसाट यांनी आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणात त्यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता संजय शिरसाट यांच्या या मागणी मान्य होते की नाही? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT