NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा राष्ट्रीय मान्यता मिळवण्याची तयारी; 'या' नेत्यांना दिली जबाबदारी

NCP Foundation Day : पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी पदाधिकारी प्रयत्न करतील
NCP Flag, Sharad Pawar
NCP Flag, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Planning to be National Party : भारतीय निवडणूक आयोगाने दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय दर्जा मान्यता काढून घेतली. महाराष्ट्र सोडून इतर राज्यात पक्षाने राष्ट्रीय पक्षाचे निकषांची पूर्तता करत नाही, असे त्यावेळी आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतर कर्नाटक निवडणुकीतही पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

गेल्या माहिन्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाने तो मागे घेतला. त्यावेळीच त्यांनी पक्षात भाकरी फिरवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त काही निवडी जाहीर केल्या. यावेळी त्यांनी प्रत्येकावर काही राज्यांची जबाबदारी सोपवली आहे. संबंधित पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

NCP Flag, Sharad Pawar
BJP News : 'भाजप माझा पक्ष थोडीच आहे..' असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे आज अमित शाह यांच्याकडे काय म्हणणं मांडणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रथमच कार्यकारी अध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे. पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केली आहे. ही निवड करताना विविध राज्यांची जबाबदारीही या पदाधिकाऱ्यांकडे दिली आहे. ही निवड आणि विविध राज्यांची दिलेली जाबबदारीतून राष्ट्रवादी काँग्रेसला पवार यांनी आगामी काळात लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी दिली आहे. सुप्रिया सुळे या महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. तर सुनील तटकरे यांच्याकडे ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यात पक्षवाढीसाठी काम करणार आहेत. डॉ. योगानंद शास्त्री यांच्याकडे दिल्ली सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

NCP Flag, Sharad Pawar
Dhnanjay Munde On Next Cm News : पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, वर्धापनदिनी मुंडेंचा संकल्प..

के. के. शर्मा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांची जाबाबदारी पार पाडणार आहेत. महम्मद फैजल तामिळनाडू, तेलंगणा, केरळ या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी वाढण्यासाठी प्रयत्न करतील. नरेंद्र वानवा यांच्याकडे सर्व पूर्वेकडची राज्यांची जाबाबदारी दिली आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवण्यासाठी काम करणार आहेत. नसीम सिद्दिकी यांच्याकडे उत्तर प्रदेश, बिहार, गोवा राज्याची जाबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडी जाहीर केल्यानंतर शरद पवार म्हणाले, "मला विश्वास आहे की ही टीम सर्व सहकाऱ्यांना उत्साह देतील, लोकांमधला विश्वास वाढवतील आणि देशातल्या परिवर्तनात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निभावण्यासाठी आपली कामगिरी चोखपणे बजावतील." प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडलेली संपूर्ण टीम पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

NCP Flag, Sharad Pawar
NCP News : सुनील तटकरेंनी सांगितले सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष नेमण्याचे कारण....

जयंत पाटील (Jayamt Patil) म्हणाले, सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहेत. मात्र इतर राज्यात पक्षाची ताकद कमी होत आहे. ती वाढवून पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित पदाधिकारी काम करणार आहे. त्यामुळे पक्षाला आगामी काळात पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळण्यास मदत होणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com