Sambhaji Bhide Sarkarnama
मुंबई

Sambhaji Bhide : वंचित, रिपब्लिकन पक्षासह समविचारी पक्षांचा भिडेंना पळवून लावण्याचा प्रयत्न

Political News : सभेच्या ठिकाणी जाऊन नोंदवला निषेध

Bhagyashree Pradhan

Dombvali News : डोंबिवली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेतर्फे शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेस वक्ते म्हणून संभाजी भिडे मार्गदर्शन करणार होते. त्यांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह रिपब्लिकन पक्षासह समविचारी पक्ष व इतर संघटना एकवटल्या होत्या. त्यांनी भिडे यांचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

डोंबिवलीत शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वक्ते म्हणून संभाजी भिडे आले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा निषेध वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.

जी व्यक्ती अंधश्रद्ध आणि अनिष्ट रूढींना थारा देते. जी थोर पुरुषांचा अपमान करते, जी व्यक्ती भारतीय संविधानाचा आणि घटनेचा अपमान करते, अशा व्यक्तीला डोंबिवलीत ज्या संस्थेने बोलावले आहे. त्या संस्थेचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे वक्तव्य रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी केले.

गेल्या दोन दिवसांपासून भिडे येथे येऊ नये म्हणून आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. तर भिडे यांच्यासारख्या भांडखोर आणि अशांतता पसरवणाऱ्या व्यक्तीला सांस्कृतिक डोंबिवलीत प्रवेश नाही, असे वक्तव्य डोंबिवली शहर पूर्व अध्यक्ष चंद्रकांत पगारे (Chandrakant Pagare) यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेतर्फे सभेच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिडीयाला देखील सभेच्या ठिकाणी सोडण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर वंचित, रिपब्लिकन आणि समविचारी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन पोलिसांना आम्ही भिडेंना येऊ देणार नाही, असे सांगितले. पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला होता. मात्र, तरीही या सर्व पक्षांनी त्यांचा जोरदार निषेध केला.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT