Kolhapur Political : यड्रावकर जाणार राष्ट्रवादीत ? टोपेंशी बंद खोलीत चर्चा...

Rajendra Patil Yadravkar and Rajesh Tope discuss : पुन्हा पवार कुटुंबीयांत घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची शक्यता.
Rajesh Tope, Rajendra Patil Yadravkar
Rajesh Tope, Rajendra Patil YadravkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political : महाविकास आघाडीच्या काळातील मंत्री आणि शिंदे गटात गेल्यानंतर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबाबत कमालीची नाराजी आहे. मात्र पूर्वापार त्यांनी पवार कुटुंबियांसोबत जोडलेल्या नातेसंबंधामुळे यड्रावकर यांच्याबाबत आजही सहानुभूती आहे की काय ? असा प्रश्न माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या भेटीनंतर उपस्थित होत आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राजेश टोपे यांची जवळपास तासभर बंद खोलीत चर्चा झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यड्रावकर यांना पुन्हा पवार कुटुंबीयांत घेण्यासाठी ही चर्चा करण्यात आली की काय ? अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजेश टोपे आपल्या कामानिमित्त इचलकरंजी येथे आले होते. त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर यड्रावकर यांच्या घरी भेट दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajesh Tope, Rajendra Patil Yadravkar
Congress : न्याय यात्रेच्या मुहूर्तावर मिलिंद देवरांची सोडचिठ्ठी कोणता करणार परिणाम?

या भेटीदरम्यान दोघांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही. सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि घडामोडीवर खलबते झाल्याचे सूत्रांकडून समजते. सध्या यड्रावकर हे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते. विजयानंतर त्यांनी शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्यांनी हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालीय. शिरोळच्या राजकारणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेहमीच यड्रावकर कुटुंबियांच्या मागे पाठबळ राहिले आहे. पूर्वापारपासून चालत आलेल्या राजकीय भूमिकेमागे शरद पवार यांच्या चालीनेच यड्रावकर कुटुंब राजकारणात आले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्याने यड्रावकर यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा सल्ला पवार यांनीच दिला असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे यड्रावकर यांना पुन्हा एकदा पवार कुटुंबियात घेण्याचे काम सुरू आहे का ? अशी चर्चा या भेटीदरम्यान सुरू झाली आहे.

(Edited by Amol Sutar)

Rajesh Tope, Rajendra Patil Yadravkar
Pune Politics : पुण्यातील मेळाव्याला अजित पवारांची दांडी; कोण करणार मार्गदर्शन?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com