Praveen Chavan sarkarnama
मुंबई

मला या प्रकरणातून बाहेर पडायचे आहे; प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा

विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रवीण चव्हाण यांच्यावर आरोप करत त्याचे पुरावे विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या प्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. सरकारने तो स्वीकारला आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत सांगितले. तसेच ही केस सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. यावर प्रवीण चव्हाण यांनी भाष्य केले.

प्रवीण चव्हाण म्हणाले, मी स्वतः हुन राजीनामा दिला आहे. या सगळ्या प्रकरणातून मला बाजूला व्हायचे होते. त्यामुळे मी राजीनामा देतो. मी कोणालाही भेटलो नाही. माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तेजस मोरेने सुपारी घेऊन हे सगळे केले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. तेजस मोरेचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांने माझ्या ऑफिसमध्ये अनेक वेळा एसी, स्मार्ट टीव्ही लावायचा हट्ट धरला होता.

रायसोनी हे कुठले ही आरोपी नाही. मी त्यांची केस का घेऊ असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणामध्ये मी कधीही वकीलपत्र घेतले नाही, असेही त्यांनी सांगितले. करोडो रुपयाची जमीन गिरीश महाजन आणि साधना महाजन यांनी त्यांच्या नावे केली, असा आरोपही चव्हण यांनी केला. या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनची कायदेशीर वैधता तपासावी लागेल. फडणवीस यांनी फॉरेन्सिक ऑडिट करण्याची घाई का केली, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.

चव्हाण म्हणाले, मी कायदेशी कारवाई करणार आहे. हे षडयंत्र कोणी रचले हे समोर येईल. चौकशीमध्ये सगळ्या बाबी समोर येतील. चोर किती ही हुशार असला तरी काही ना काही मागे ठेऊन जातो. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मी वारंवार तेजस मोरेला सांगितले होते. ऑफिसमध्ये येऊ नको..त्याला मला फस्वायचेच होते. माझ्या ऑफिसमधून मोबाईल, लॅपटॉप बॅग चोरीला गेला होता, असा दावाही चव्हाण यांनी केला.

प्रकरण काय?

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना एका गुन्ह्यात अडकवून मोक्का लावण्याबाबत सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी रचनलेल्या षडयंत्राबाबत चे पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळात सादर केले होते. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता प्रवीण चव्हाण यांनी सरकारी वकिलपदाचा राजीनामा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT