फडणवीसांचा पुन्हा पेनड्राईव्ह बॉम्ब; वक्फ बोर्डातील सदस्याचे दाऊदशी संबध असल्याचे दिले पुरावे...

Devendra Fadnavis|Mahavikas Aghadi Government : देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) अजून एक व्हिडिओ बॉम्ब टाकला असून आज (ता.14 मार्च) त्यांनी दुसरा पेनड्राइव्ह विधानसभेत सादर करत खळबळ उडवून दिली. हा दुसरा पेनड्राइव्ह फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला असून या पेनड्राइव्हमध्ये चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर मलिकांनी नियुक्त केली आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

Devendra Fadnavis
Video: दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या: अजित पवारांनी दिले आव्हान

वक्फ बोर्डाच्या एका सदस्याने एका महिलेवर बलात्कार केला आहे. या महिलेने तशी तक्रार दिली असून तरीही हा सदस्य मोकाट आहे. याचबरोबर या सदस्याचा दाऊदशी (dawood) संबंध आहे. मग हा व्यक्ती वक्फ बोर्डात सदस्य कसा?,असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. या वक्फ बोर्ड सदस्याच्या संभाषणाचा व्हिडीओ पेनड्राईव्हमधून त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिला. या प्रकरणातील एक जण तुरुंगात असून त्याच्या मोबाईलमध्ये यासंदर्भातील सर्व संभाषण उपलब्ध आहे. त्यामुळे या व्यक्तीला ताब्यात घेण्याची मागणी फडणवीसांनी केली. यासंदर्भातील पुराव्याचा पुन्हा दुसऱा पेनड्राईव्ह सभागृहात सादर करत फडणवीसांनी पुन्हा एकादा खळबळ उडवून दिली आहे.

Devendra Fadnavis
हत्या काँग्रेस नगरसेवकाची अन् विधानसभेत गोंधळ घातला भाजपनं

अल्पसंख्यांक विभाग लोकांचा दाऊदशी सबंध आला तर काम देणार का? मी पेनड्राईव्ह देतो. आता या पेनड्राईव्ह मध्ये दोन पात्र आहेत मोहंमद अर्शद खान, आणि डॉ मुदसैर लांबे, यांना नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डमध्ये नियुक्त केले आहे. त्यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. मात्र, त्यानंतर लग्नाच्या आश्वासनामुळे ऑक्टोबर 2020 पर्यंत ही महिला पोलीस तक्रारीची वाट पाहत राहिली. मात्र, हा प्रकार समजल्यानंतर या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे. त्यामुळे या महिलेने लांबेला आत्महत्येचा इशाराही दिला आहे. या महिलेच्या पतीविरोधात लांबेंनी चोरीची तक्रार दिल्याने या महिलेचा पती तुरुंगात गेला. मात्र लांबे अजून मोकाट आहे, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
भाजपला आव्हान देत धनंजय मुंडेंनी सभागृहातच शड्डू ठोकला!

याबरोबरच फडणवीसांनी अर्शद खान अटकेत असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात यावा, अशी मागणी केली. या मोबाईलमध्ये या दोघांचेही संवाद असून दाऊदबाबतच्या त्यांच्या संबंधाचा त्यात खुलासा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मोबाईलमधील असलेले संभाषण डिलीट करण्याआधी मोबाईल ताब्यात घ्या, अशी मागणी केली आहे. याबरोबरच अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील मात्र, बॉम्ब स्फोटात सहभागी असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत फडणवीसांनी महाविकास आघाडीसा सुनावले आहे.

फडणवीस यांनी सादर केलेल्या पेनड्राईव्हमधील संवादमध्ये डॉ. लांबे अर्शद खानला म्हणतात की, सलामवालेकूम…मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम…मेरे ससूर दाऊद कें राइट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दाऊद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है, असे संभाषण आहे. यापुढे अर्शद खान म्हणतो.. तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.

डॉ. लांबे - मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.

खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.

डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है, तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेंरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.

खान : इसलिए मैने पुछा सही-सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेन्शन है.

डॉ. लांबे : अर्शद मै तो बोलता हु की, तुम अभी तुम अभी वक्फ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वक्फ के काम शुरू करो. कमाने का सेंटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा.

खान : अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.

डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.

खान : अर्शद के नाम सें बिल्डींग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.

डॉ. लांबे : तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नही बैठ सकती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com