Raj Thackeray News Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : राज ठाकरेंची नेत्यांवर टोलेबाजी; राजकारणावर साहित्यिकांनी बोललं पाहिजे...

Mangesh Mahale

Thane : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते डॉ. नागेश कांबळे यांच्या कुसुमाग्रजांच्या असंग्रहित कथा, कवितांचे प्रकाशन ठाण्यात रविवारी झाले. राज ठाकरे यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा आढावा घेत त्यांचे कौतुक करताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले. सध्याच्या राजकारणावर त्यांनी फटकेबाजी केली.

राजकीय परिस्थितीवर साहित्यिकांनी बोललं पाहिजे...

"साहित्यिक, कवी यांनी राजकीय वातावरणावर बोलायला हवे. कवींनी याबाबत बोलायला सुरुवात केली तर त्यांचेही महत्त्व वाढेल. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजचे वातावरण रोजच्या रोज गडूळ होत चालले आहे. भविष्यातील पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहोत. आपण कोणाला मतदान द्यावी, हे जनतेला कळेल. आपले मराठी साहित्य दुसऱ्या भाषेत आले पाहिजे. आपली संस्कृती दुसऱ्या देशाला समजायला पाहिजे," असे राज ठाकरे म्हणाले.

त्याचं आपल्यालाच कौतुक नाही...

कुसुमाग्रज हे मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्याचं मोठेपण किती मराठी माणसांना कळले हे मला माहिती नाही, पण त्यांच्याविषयी मी एक लेख वाचला होता. त्यामध्ये लिहलं होतं की, जेव्हा ऋषिकेश मुखर्जींनी आनंद चित्रपट केला, तेव्हा आनंद चित्रपट रिलीज झाला तेव्हा काही एवढी थिअटर्स नव्हती. तेव्हा ते मुंबईवरून नाशिकला गेले आणि त्यांनी एक थिअटर्स बुक केलं. त्यांनी कुसुमाग्रजांना तो चित्रपट दाखवला. तो चित्रपट त्यांनी पाहावा आणि त्यांची प्रतिक्रिया त्यांना हवी होती. एका बंगाली माणसाला त्याच्या चित्रपटावर एका मराठी माणसांची प्रतिक्रिया हवी होती. या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी माणसं जन्माला आली त्याचं आपल्यालाच कौतुक नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

कुसुमाग्रजांची कविता नेत्यांना समजली नाही

राज ठाकरे म्हणाले,'पन्नाशीची उमर गाठली' ही कुसुमाग्रजांची कविता मंत्रालयात लावण्यात आली आहे. त्यावरून राज ठाकरेंनी नेत्यांवर टोलेबाजी केली. "कुसुमाग्रज यांची 'पन्नाशीची उमर गाठली' ही कविता मला अत्यंत आवडते. ही कविता प्रत्येकाच्या घरात लावली पाहिजे आणि जो चुकत असेल त्याला ती पाठवली पाहिजे. ही कविता मंत्रालयात लावली होती. जागा चुकली होती. कुसुमाग्रजांची कविता राजकीय लोकांना समजली नाही. ती कविता निदान जनतेला तरी समजली पाहिजे," राज ठाकरे यांनी कुसुमाग्रज यांची कविता वाचली. या वेळी त्यांनी भारत-इंडिया वादावर भाष्य केले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT