Nitesh Rane News : 'अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष' असे बॅनर रोहित पवारांचे लागले पाहिजेत; नितेश राणेंनी हिणवलं...

Nitesh Rane slams Rohit Pawar : राजकारणाच्या पलीकडे काही नाती असतात, ती रोहित पवारांनी जपावीत," असा सल्ला राणेंनी रोहित यांना दिला आहे.
 Rohit Pawar, Nitesh Rane
Rohit Pawar, Nitesh Rane Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sindhudurg : विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना राज्यात 'भावी मुख्यमंत्री'वरून चर्चांना पेव फुटले आहे. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवारांच्या बॅनरमुळे पुन्हा 'भावी मुख्यमंत्री'च्या चर्चांना ऊत आला आहे. भाजपचे नेते, आमदार नितेश राणेंनी रोहित पवारांच्या 'भावी मुख्यमंत्री' बॅनरवरून खिल्ली उडवली आहे.

रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. त्यावर खोचक टिप्पणी करीत नितेश राणेंना टोला लगावला आहे. "रोहित पवारांसाठी भावी मुख्यमंत्रिपद लहान आहे, त्यांचे 'भावी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष' असे बॅनर लागले पाहिजे," अशा शब्दांत राणेंनी रोहित पवारांना हिणवलं आहे.

"अजितदादा आणि भाजपचे संबंध काय आहे, हे घराच्या बाहेर राहणाऱ्यांना काय समजणार? रोहित पवारांनी अजितदादा व त्यांचे संबंध सांगावेत. राजकारणाच्या पलीकडे काही नाती असतात ती रोहित पवारांनी जपावीत," असा सल्ला राणेंनी रोहित यांना दिला आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर राणेंनी निशाणा साधला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर लावणाऱ्या आपल्या समर्थकांना रोहित पवारांना सल्ला दिला आहे. "माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर आणि आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते वेगवेगळे बॅनर लावताहेत.. पण असे बॅनर न लावता त्यावर होणाऱ्या खर्चातून आपण शालेय विद्यार्थी आणि चांगलं काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांना आवश्यक वस्तू द्या. शेवटी आपण इथं कोणत्या पदासाठी नव्हे तर विचारधारेच्या लढाईसाठी काम करत आहोत. पदं येतात आणि जातात..पण विचारधारेचं तसं नाही, ती एकदा सोडली तर कोणत्याही पदाला किंमत राहत नाही. हाच विचार कार्यकर्त्यांनीही पुढं न्यावा," असे टि्वट रोहित पवारांनी केलं आहे.

या बॅनरबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, "कार्यकर्त्यांना मी मागे सांगितले होते की असे बॅनर लावू नका, कारण असे बॅनर लावून काहीही उपयोग नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते. अशा प्रकारचे बॅनर कोणी लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर १४५ चा आकडा गाठावा लागतो. नाहीतर मुख्यमंत्री व्हायचं हे केवळ दिवा स्वप्नच राहते."

Edited By : Mangesh Mahale

 Rohit Pawar, Nitesh Rane
Ajit Pawar News : मुख्यमंत्री व्हायचं केवळ दिवा स्वप्नच! रोहित पवारांच्या 'त्या' बॅनरवर अजितदादांची मिश्किल टिप्पणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com