Swabhimani Sanghtana, Raju Shetty
Swabhimani Sanghtana, Raju Shetty Sarkarnama
मुंबई

Raju Shetty : एक रकमी एफआरपीसाठी आज शेतकऱ्यांच्या एल्गार ;साखर संकुलावर धडक मोर्चा

सरकारनामा ब्युरो

Raju Shetty : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवारी) साखर संकुल पुणे येथे राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एकरकमी एफआरपी करा, या प्रमुख मागणीसाठी अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. (Raju Shetty latest news)

राज्यात आँक्टोबरपासून गाळस हंगामास सुरवात झाली आहे. मात्र नेहमीप्रमाणे गाळप हंगामाच्या सुरवातीपासूनच स्वाभिमान शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याचे चित्र आहे.

एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty)यांनी नुकताच दिला आहे. एफआरपी ठरविण्याचे सूत्र बदलावे, असेही शेट्टी यांनी सांगितले आहे.

आजच्या मोर्चातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.

  1. दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एकरकमी करा

  2. काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करा

  3. मागील वर्षाची एफआरपी + २०० रूपये तातडीने द्या.

  4. सर्व ऊस तोडणी कामगार तोडणी महामंडळामार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत

  5. गतवर्षीच्या सरासरी रिकव्हरीस आधारित चालू हंगामात एक रक्कमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रूपये उचल द्या.

  6. तोडणी मशिनने तुटलेल्या उसाला पालापाचोळ्याची कपात ४.५० टक्याऐवजी १.५० टक्के करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT