अंधेरीत पोटनिवडणुकीत 'NOTA'ने घेतली दोन नंबरची मते,मात्र आतापर्यंतचे विक्रम माहिती आहेत का?

NOTA : ऋतुजा लटके 53 हजार 471 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
NOTA, Election, Andhweri Election, Rutuja Latke Latest News
NOTA, Election, Andhweri Election, Rutuja Latke Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके 53 हजार 471 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

त्यांना एकूण 66 हजार 247 मते पडली, तर 'नोटा'ला (NOTA) 12 हजार 776 मते पडली आहेत. यामुळे नोटाला पडलेल्या मतांची चांगलीच चर्चा होत आहे. मात्र आतापर्यंत नोटाने यापेक्षाही जास्त मते मिळवल्याचा विक्रम महाराष्ट्रातचं मराठवाड्यात झाला आहे. (NOTA, Election, Andhweri Election, Rutuja Latke Latest News)

NOTA, Election, Andhweri Election, Rutuja Latke Latest News
Sharad Pawar : मनसे नेत्याने केला शरद पवारांच्या इच्छाशक्तीला सलाम...

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघात नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती ती अंधेरी पोटनिवडणुकीच्या तुलनेत सुमारे दुप्पट म्हणजे २७,५०० मते पडली होती. यामुळे विधानसभा निवडणुकीतील ही सर्वाधिक नोटाला पडलेली मते आहेत. शिवाय लोकसभेसाठी-बिहारच्या गोपाळगंज मतदारसंघात 2019 मध्ये 51 हजार 660 मतं NOTA ला पडली होती. हा देखील एक मोठा विक्रम नोटाच्या नावावर आहे.

NOTA, Election, Andhweri Election, Rutuja Latke Latest News
ऋतुजा लटकेंच्या विजयाचे खरे शिल्पकार फडणवीस..अन्यथा शिवसैनिकांचे चेहरे लटकले असते...

विधानसभा मतदारसंघांत नोटाला पडलेल्या मतांचा विचार केल्यास राज्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक मतदारांनी नोटाला मते दिल्याचा विक्रम आहे.

2019 ला या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख विजयी झाले होते. त्यांना या निवडणुकीत 1 लाख 35 हजार मते मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकांची मते ही नोटाला मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांना 13, 524 इतकी मते मिळाली होती. आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) ऋजुता लटके यांच्यानंतर नोटाला 12,776 मतदारांनी मते दिली आहेत.

NOTA, Election, Andhweri Election, Rutuja Latke Latest News
आगरी समाजाच्या मतांसाठी आग्रह धरला तो आता का नाही?; भोईरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले...

दरम्यान, असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफाॅन्स या संस्थेने NOTA ला देशभर मिळालेल्या मतांच्या आधारे तयार केलेल्या अहवालात गेल्या पाच वर्षांत विविध लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये 1 कोटी 29 लाख मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारल्याची माहिती प्रसिद्ध केली असून त्यापैकी 64 लाख मतदारांनी विधानसभा निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय वापरल्याचे नमुद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com