I.N.D.I.A.'s Mumbai Meeting Dinner Menu Sarkarnama
मुंबई

I.N.D.I.A.'s Mumbai Meeting: 'इंडिया'च्या 'डिनर'मध्ये मराठी संस्कृती; पुरणपोळी, झुणका-भाकर, वडापाववर नेते मारणार ताव..

सरकारनामा ब्यूरो

रश्मी पुराणिक -

Mumbai Political News: काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची पुढची बैठक राज्याची राजधानी मुंबईत 31 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे बैठकीसाठी मुंबईत दाखल होणाऱ्या नेत्यांचे स्वागत महाराष्ट्रीय पद्धतीने होणार आहे. यामुळे या बैठकीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षीय नेत्यांना महाराष्ट्रीय आणि मराठी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. (Latest Marathi News)

भाजपविरोधी इंडिया 'आघाडी'च्या बैठकीसाठी मुंबईत उपस्थित राहणाऱ्या नेत्यांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रीय परंपरेची ओळख असलेली तुतारी आणि नाशिक ढोलच्या वादनाने नेत्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यामुळे नेत्यांना मराठी संस्कृतीची ओळख घडवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे मुंबईतील आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

नेत्यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी डिनरमध्ये मराठमोळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. महाराष्ट्राची ओळख असणारी पुरणपोळी, झणझणीत झुणका-भाकर, वडा-पाव असे पदार्थ नेत्यांच्या डिनरमध्ये असणार आहेत. यामुळे विरोधी आघाडीतील देशभरातील नेत्यांना मराठी संस्कृती - मराठी खाद्यपदार्थांची ओळख होणार आहे. पंचतारांकित हॉटेलमधील १७५ खोल्या नेत्यांसाठी बुक केल्या जाणार आहेत. विविध राज्यातून ६० ते ६५ नेते बैठकीला राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीची ही जोरदार तयारी आहे. बैठकीत सर्व पक्षांचे आघाडीत संवाद आणि समन्वय राखण्याबाबत समिती नेमण्यात येणार आहे. ही अकरा जणांची समितीची असणार, अशी माहिती मिळत आहे. आगामी निवडणुका, आघाडीची वाटचाल यावर सर्व पक्षांची भूमिका लक्षात घेऊन यावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी 'इंडिया' आघाडीच्या लोगो लॉन्चिंगसुद्धा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT