NCP Crisis News : 'बीड सभेच्या' पार्श्वभूमीवर अजितदादा-धनंजय मुंडेंची बैठक सुरू; कशी असणार रणनीती?

Dhananjay Munde And Ajit Pawar Meeting : बीडमध्ये सभा घेऊन शदर पवारांनी आव्हान निर्माण केले...
NCP Crisis News : Dhananjay Munde And Ajit Pawar Meeting
NCP Crisis News : Dhananjay Munde And Ajit Pawar MeetingSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनेच्या पुनर्बांधणी सभांचा धडका सुरू ठेवला. येवल्यानंतर त्यांनी बीड शहरात जाहीर सभा घेत पक्षातील फुटीरांपुढे आव्हानच निर्माण केले. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. (Ajit Pawar News)

बीडमधील शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवार गटाचीही सभा बीडमध्येच होत आहे. यामुळे दोन्ही गटात सुप्त संघर्षाचे चिन्हे दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मुंबईत बैठक पार पडत आहे. (Latest Marathi News)

NCP Crisis News : Dhananjay Munde And Ajit Pawar Meeting
Uddhav Thackeray On BJP : 'मी भाजपशी 'पॅचअप' करू शकलो असतो पण..' ; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान !

अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात बैठक सुरू झाल्याचे समजते आहे. मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनात ही बैठक सुरु असल्याची माहिती आहे. बीडमध्ये रविवारी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकील विशेष महत्त्व आहे. सभेसोबतच बीड जिल्ह्यातील विकास कामे, प्रलंबित कामे आणि दुष्काळी परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री यांच्या सोबतच्या बैठकीत चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे.

NCP Crisis News : Dhananjay Munde And Ajit Pawar Meeting
Sharad Pawar Vs Eknath Shinde : कांद्यावरून शरद पवार-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात कलगीतुरा !

अजित पवारांच्या या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, संजय दौंड, राजकिशोर मोदी हे देखील बैठकीला उपस्थित आहेत. यामुळे बीडमधील रविवारच्या सभेतून शरद पवार यांच्या गटाला कसे उत्तर द्यायचे? मतदारांपुढे आपली भूमिका काय ठेवावी, याबाबत रणनीती आखण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com