Impact of Vote Chori Controversy on Upcoming Elections : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कथित मतचोरीच्या मुद्द्यावर वारंवार भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. विविध मतदारसंघातील मतदान तसेच मतदारयादीतील घोळाची माहिती देत ते आयोगाकडून भाजपचा बचाव केला जात असल्याचा आरोप करत आहेत. लवकरच याबाबत हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही ‘मतचोरी’वरच ‘सर्जिकल स्टाइक’ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित घोळाबाबत भाष्य केले आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत आपण खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा खुलासा कधी करणार, याबाबत त्यांनी सांगण्यास नकार दिला. इडिंया दुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हीही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतचोरीबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मागील वर्षी निवडणुकीआधीच आयोगाला पत्र लिहून अचानक वाढलेली मतदारसंख्या, गायब मतदार आणि मतदान केंद्रांवरून गैरव्यवस्थापनाबाबत पत्र लिहून माहिती दिली होती. अशा सर्व घोळाबाबत पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती देणार आहोत.
आपल्या सर्जिकल स्टाइकबाबतच्या टायमिंगचा खुलासा करणार नसल्याचेही ठाकरेंनी सांगितले. आम्हाला अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याबाबतचा अभ्यास सुरू आहे. निवडणुकीत आलेला निकाल आम्ही मान्य केला. पण हे सरकार योग्यप्रकारे काम करत नाही. एक उपमुख्यमंत्री आपल्या गावात जाऊन रडत बसतात तर कधी दिल्लीत जाऊन तक्रारी करत आहेत, अशी टीकाही आदित्य यांनी केली.
भाजपसोबत पुन्हा जाण्याच्या चर्चेबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, काही गोष्टींवर कधीची समझोता होऊ शकत नाही. ज्याप्रकारे सरकार चालवले जात आहे, ज्याप्रकारे मुंबई महापालिकेत, राज्यात लूट सुरू आहे, त्याच्याशी समझोता केला जाऊ शकत नाही, असे ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आमचे कधीही वाईट संबंध नव्हते आणि राहुल गांधी यांच्यासोबतही चांगले संबंध राहिले असल्याचेही आदित्य म्हणाले. राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.