Rahul Gandhi sarkarnama
मुंबई

Rahul Gandhi News : राहुल गांधींची महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी घोषणा; आता दर महिन्याला बँक खात्यात 'खटाखट'..!

Rahul Gandhi in Mahavikas Agahadi Mumbai Rally : 'मविआ'चे सरकार आल्यानंतर महाष्ट्रात महिलांसाठी बस प्रवासही मोफत असणार, असेही राहुल गांधींनी यावेळी जाहीर केले.

Mayur Ratnaparkhe

Rahul Gandhi big Announcement for women in Maharashtra : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. आज राहुल गांधी हे महाराष्ट्रात आले असून सर्वप्रथम त्यांनी नागपूरमध्ये संविधान सभेच्या कार्यक्रमास हजेरी लावली. त्यानंतर आता ते मुंबईत दाखल झाले असून, इंडिया आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी एका संयुक्त महासभेतून केला.

यावेळी भाषण करताना राहुल गांधींनी(Rahul Gandhi) इंडिया आघाडीच्या पाच गॅरंटी पैकी पहिली गॅरंटी असणाऱ्या महालक्ष्मी योजनाबाबत माहिती देताना सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकार येताच महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात खटाखटखटाखट तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला जमा होतील. एवढच नाहीतर महिलांना महाराष्ट्रात मोफत बस प्रवास असेल, अशीही त्यांनी घोषणा केली.

याआधी भाषणात राहुल गांधी म्हणाले, 'ही लढाई विचारधारेची आहे. एकीकडे भाजप(BJP), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुसरीकडे इंडिया आघाडी. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, एकता समानता, प्रेम, आदर आणि दुसऱ्या बाजूला समोरून नाहीतर लपून भाजप, आरएसएसचे लोक हे संविधान ते नष्ट करू इच्छित आहेत.' असंही राहुल गांधी म्हणाले.

इंडिया आघाडीच्या सभेत महाविकास आघाडी(MVA)कडून महाराष्ट्रतील जनतेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये महालक्ष्मी योजना - महिलाना दर महिन्यास तीन हजार रुपये, २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपये, शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि जातनिहाय जणनगणना या गॅरंटींचा समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT