Rahul Gandhi News : 'देशात निश्चितपणे जात जनगणना होईल, 50 टक्के आरक्षणाची भिंत तोडून टाकू'

Rahul Gandhi criticizes BJP and RSS : नागपूरमधील संविधान सभेत राहुल गांधींची घोषणा; भाजप आणि 'आरएसएस'वर साधला आहे निशाणा!
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi In Nagpur News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आज(बुधवार) नागपूर येथून केली आहे. सर्वप्रथम राहुल गांधी यांनी दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी संविधान संमेलनास संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, जात आधारित जनगणना नक्कीच होईल आणि या प्रक्रियेमुळे दलित, अन्य मागासवर्ग आणि आदिवासींसोबत होत असलेला अन्याय समजेल. जात जनगणनेमुळे सर्वकाही स्पष्ट होईल. प्रत्येकाला समजेल की, त्यांच्याकडे किती शक्ती आहे आणि त्यांची भूमिका काय आहे. तसेच राहुल गांधींनी हेही सांगितले की, आम्ही ५० टक्के आरक्षणाची भिंतही तोडून टाकू.

Rahul Gandhi
Marathwada Politics : मराठा आरक्षण आंदोलन, 'मविआ'ची वाढलेली ताकद महायुतीला पुन्हा जेरीस आणणार?

राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, तर जीवन जगण्याची एक पद्धती आहे. जेव्हा आरएसएस आणि भाजपचे लोक संविधानावर हल्ला करतात, तर ते तेव्हा देशाच्या आवाजावर हल्ला करत असतात.

राहुल गांधींनी दावा केला, ''अदाणींच्या कंपनीच्या व्यवस्थापनात तुम्हाला एकही दलित, ओबीसी आणि आदिवासी सापडणार नाही. बरेलीमध्ये मी चुकून म्हटले की जेवढे अधिकारी आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. त्यामध्ये मला एकही दलित किंवा ओबीसी(OBC) नाव ऐकू आलं नाही. तर केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधींनी म्हटले की, तुम्ही केवळ २५ जणांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करतात, परंतु जेव्हा मी शेतकरी कर्जमाफी बद्दल बोलतो तेव्हा माझ्यावर हल्ला केला जातो.''

Rahul Gandhi
Rahul Gandhi: शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्यासाठी राहुल गांधी नागपूरला; बावनकुळेंच्या आरोपाने खळबळ

राहुल गांधी नागपूर नंतर मुंबईला जाणार आहेत. जिथे ते महाविकास आघाडीच्या(MVA) प्रचाराला सुरुवात करतील. मुंबईत महाविकास आघाडीचे नेते संयुक्त हमी पत्र देणार आहेत.त्यानतंर मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची संयुक्त सभा होईल, यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही उपस्थिती असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com