Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra, Nanded Latest News
Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra, Nanded Latest News Sarkarnama
मुंबई

अर्धापुरात फुलांची उधळण करीत राहुल गांधींचे जल्लोषात स्वागत...

सरकारनामा ब्यूरो

अर्धापूर : भारत जोडो यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या दिवशी अर्धापूर तालुक्यात शुक्रवारी (ता ११ नोव्हेंबर) सकाळी आगमन झाले. यात्रेचे पारंपरिक पद्धतीने व उत्साहात स्वागत करण्यात आले. यात्रेच्या मार्गांवर कब्बडीचे सामने रंगले तर कुठं आदिवासी नृत्याने लक्ष वेधले.

यामध्ये पारंपरिक गोंधळ, लेझीम पथक, भजणी दिंड्या, दंडार नृत्य यांनी वातावरणा उत्साह निर्माण झाला. रसत्याच्या दुतर्फा नागरिकांनी राहुल गांधी यांना पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. (Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra, Nanded Latest News)

कांग्रेसचे (Congress) राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काढलेली भारत जोडो यात्रेच्या पाचव्या दिवशीचा प्रवास भोकरफाटा परिसरातुन सुरू झाला. या यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत ज्येष्ठ नेते जयराम रमेश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले, आमदार अमर राजूरकर आमदार सुरेश वरपुडकर, आमदार माधवराव जवळगावकर, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर सरचिटणीस संजय देशमुख लहानकर पप्पु पाटील कोंढेकर तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे शहराध्यक्ष राजू शेटे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसबीर खतीब शहराध्यक्ष राजू शेटे आदी सहभागी झाले होते.

आमदार सुरेश वरपुडकर यांनी वसमत फाटा परिसरात खास कब्बडीचे सामने, व गोंधळाचे आयोजन केले होते. गोधळ व कब्बडीच्या सामन्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले. शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात माजी सभापती पप्पु बेग व मुसबीर खतीब यांनी खास आदिवासी नृत्यानचे आयोजन केले होते. या नृत्याने एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. तर शहरातील केळीच्या व्यवसायीकांनी केळी, सफरचंद, फराळाचे वाटप केले.

शेणी पाटी जवळ भजनी मंडळींनी भजन कीर्तन केले व‌ फुलांची उधळण करीत राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. ओबीसी विभागाच्या वतीने विविध महापुरुषांचे सजिव देखावे सादर केले व लेझीम पथकाने स्वागत केले. बसवेश्वर चौकात नगरपंचतीने स्वागत करण्यात आले.

दरम्यान,यात्रेच्या मार्गांवर विविध कला प्रकार व खेळांच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. मुंबईतून काही विद्यार्थी या यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्या सोबत फुटबॉल खेळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT