मुंबई : ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले होते आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद केला होता.यामुळे यावेळी मोठा राडा झाला होता.
याप्रकरणी आव्हाड यांच्यासह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना आज (ता.११ नोव्हेंबर) वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले यावेळी त्यांना अटक करण्यात आली असल्याचे खुद्द आव्हाडांनीच माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे. (Dr. Jitendra Awhad Latest News)
आपण चांगल्या कामासाठी आंदोलन केले आहे. यामुळे मी या प्रकरणी जामीन मागणार नाही. सरकार पोलिसांवर दबाव टाकत असून सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच, आधी माझ्यावर लावलेले कलमांवरून मला अटक होऊ शकत नव्हती. मात्र, आता कलम वाढवण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आव्हाडांना (Jitendra Awhad) अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या अटकेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.