Shivsena News : युवा सेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवा सेनेने कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे, त्याबाबत राहुल यांनी ट्विट करत ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Rahul Kanal strongly criticized Thackeray before joining the Shinde group)
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी ट्विट करत ठाकरे गटाला उत्तर दिले आहे. ते आपल्या ट्विट म्हणतात की, दुःख होतंय, हे कोणी केलंय, हे चांगलंच माहिती आहे. पण, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं, त्यांचं न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे.
तुम्ही मला हटवू शकलात, पण ज्यांनी रात्रंदिवस तुमच्यासाठी काम केलं आहे, त्यांना हटवू शकत नाही. चलो अच्छा है! सबको पता चले के इगो और ॲरोगन्स क्या होता है!, अशा शब्दांत राहुल कनाल यांनी ठाकरे यांच्या कारवाईबद्दल भाष्य केले आहे. त्यामुळे कनाल आणि ठाकरे यांच्यात यापुढे वाक्युद्ध रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राहुल कनाल हे शिवसेनेत (Shivsena) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच राहुल कनाल यांनी नाराज होऊन युवा सेनेचा ग्रुप सोडला होता. त्यानंतर चर्चेला उधाण आले होते. तेव्हापासून कनाल हे ठाकरे यांची साथ सोडणार, अशी चर्चा रंगली होती. पण, त्यानंतरही राहुल कनाल युवा सेनेत कायम होते. त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर ठाकरे यांचे फोटो होते. मात्र, गुरुवारी त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.