Solapur DCC Bank : माजी मंत्री, बड्या नेत्यांसह माजी अधिकाऱ्यांचा नोटिसा स्वीकारण्यास नकार

भाजपच्या त्या पाच आमदारांच्या पत्रावर प्रशासकांना मुदतवाढ मिळाली आहे. निवडणुका आवश्‍यक असताना कारवाईचा फार्स कशाला?
Solapur DCC bank
Solapur DCC bankSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार असलेले तत्कालीन संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार कायदा कलम ८८ अन्वये नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. या नोटिशीला माजी संचालक, माजी अधिकारी हात लावायलाही तयार नाहीत. बहुतांश जणांनी या नोटीस स्वीकारल्या नसल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. (Solapur DCC: Refusal to accept notices of former ministers, senior leaders and former officials)

दरम्यान, निवडणुका आवश्‍यक असताना कारवाईचा फार्स कशाला? भाजपच्या (BJP) त्या पाच आमदारांच्या पत्रावर प्रशासकांना मुदतवाढ मिळाली. मिळालेली मुदतवाढ ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा मुद्दा पुढे करून जोरदार न्यायालयीन लढाईची तयारी माजी संचालकांच्या (निवडणूक इच्छुक) गोटात सुरू झाली आहे.

Solapur DCC bank
Ambadas Danve Statement: संतोष बांगरांच्या मंत्रिपदाच्या दाव्यावर अंबादास दानवेंची भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले ‘...तर मटक्याला...’

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या याचिकेनंतर पुणे विभागाचे सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले यांनी निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची नियुक्ती करून सोलापूर (Solapur) डीसीसीने (District Bank) नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार डॉ. तोष्णीवाल यांनी १७ जून रोजी सर्व संचालकांना त्यांच्या पत्यावर नोटिसा पाठविल्या आहेत. साधारणतः २० ते २७ जूनच्या दरम्यान या नोटीस संचालकांच्या दारी धडकल्या आहेत.

Solapur DCC bank
Leaders of Opposition Meeting : विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीसंदर्भात शरद पवारांची महत्वपूर्ण माहिती; ही बैठक शिमल्याऐवजी 'या' शहरात होणार

या नोटीस स्वीकारायच्या नाहीत, अशीच भूमिका जवळपास बहुतांश माजी संचालकांनी घेतल्याचे समोर येत आहे. तशीच भूमिका तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनात आणि राजकारणात येत्या काळात जोरदार न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे.

Solapur DCC bank
Siddaramaiah Government Decision : केंद्राचा तांदूळ पुरवठ्यास नकार; सिद्धरामय्या सरकार अशी राबविणार मोफत तांदूळ योजना

बँकेची निवडणूक घ्या या मागणीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर ११ जुलैला सुनावणी होणार आहे. जिल्हा बँक, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व राज्य सरकार यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत दिल्या आहेत. येत्या ११ जुलैच्या सुनावणीत सरकार व प्राधिकरण काय म्हणणे सादर करते? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

Solapur DCC bank
Maharashtra Politic's : एखाद्याने विकेट दिली तर, ती घेतलीच पाहिजे ; पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा षटकार

पाच जुलै महत्त्वाचा

आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी डॉ. तोष्णीवाल यांनी पाठविलेल्या नोटीसवर पहिली सुनावणी येत्या ५ जुलैला सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेत होणार आहे. नोटीसच स्वीकारल्या नसतील तर पुढे काय? या कायदेशीर मुद्यांसह या सुनावणीत माजी संचालक व तत्कालीन अधिकारी कोणती भूमिका घेणार? यावर डीसीसीची आगामी रणनीती अवलंबून असणार आहे.

Solapur DCC bank
Pawar Vs Fadnavis : सत्तेशिवाय जगू शकत नाही, ही फडणवीसांची अस्वस्थता महाराष्ट्रासमोर आणायची होती; शरद पवारांचे सूचक विधान

एकदा रद्द झालेली चौकशी पुन्हा कशी करता येते?

जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी यापूर्वी २०१५ मध्ये आदेश झाला होता. या विरोधात उच्च न्यायलयात याचिका दाखल झाली. न्यायालयाने हे प्रकरण सहकार विभागाकडे पाठविले. उच्च न्यालयाच्या आदेशाची दखल घेऊन सहकार विभागाने २०२२ मध्ये ही चौकशी रद्द केली. एकदा रद्द झालेली चौकशी पुन्हा कशी लागू शकते? असा प्रश्‍न येत्या काळात उपस्थित केला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com