Rahul Lonikar  
मुंबई

Rahul Lonikar : भाजपकडून राहुल लोणीकरांवर मोठी जबाबदारी

Rahul Lonikar राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची पावले उचण्यास सुरुवात झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Rahul Lonikar : भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष पदी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या मुलाची म्हणजेच राहुल लोणीकर यांची नियुक्ती करण्यात आली. राहुल लोणीकर हे युवा मोर्चाचे सरचिटणीस होते. त्यानंतर आज भाजपा युवा मोर्चाच्या मुंबईतील भाजप (BJP) प्रदेश कार्यालयात बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटली यांच्या उपस्थितीत राहुल लोणीकर यांची युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची पावले उचण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षची आज निवड करण्यात आली.

सध्याचे भाजपच्या युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे आज या नावाची घोषणा होऊ शकते. जुलै २०२० मध्ये विक्रांत पाटील यांची भाजपच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. तर राहुल लोणीकर हे सरचिटणीस होते. आता विक्रांत पाटील यांच्या जागी राहुल लोणीकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. विक्रांत पाटील यांच्या आधी योगेश टिळेकर यांच्याकडे गेली पाच वर्षे या पदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांच्यासोबत सरचिटणीस म्हणून काम पाहणाऱ्या विक्रांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी संधी मिळाली.

भाजपच्या तरुण नेत्यांमध्ये या पदाचे आकर्षण असते. भाजपच्या अनेक विद्यमान नेत्यांनी या पदावर काम करून पुढे राज्यात आपला ठसा उमटवला. विक्रांत पाटील, योगेश टिळेकर यांच्यासह पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर अशा तरुण नेत्यांनी गेल्या दशकात या पदावर काम केलं आहे. त्या आधी गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे या नेत्यांनीही युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात आपला ठसा उमटविला होता.

कोण आहेत राहुल लोणीकर?

- राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव

- भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री

- जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक

- जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT