Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबतच्या प्रकरणाची सुनावणी वेळापत्रक निश्चित झाली आहे. १३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान हा युक्तिवाद होणार असून, २३ नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांमध्ये अंतिम सुनावणी पार पडणार आहे, तर याबाबतचा अंतिम निकाल थेट डिसेंबरच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आह. आता वेळापत्रक जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
राहुल नार्वेकर म्हणाले, "आम्ही काल जो काही निर्णय दिला आहे, त्याच्यामध्ये सुनावणी कशी होणार आहे. त्याची प्रक्रिया कशी असणार आहे. या संदर्भातली संपूर्ण माहिती, सर्व याचिकाकर्त्यांना-पक्षकारांना दिली आहे. त्यानुसार ही कारवाई पुढे जाईल. मला खात्री आहे, लवकरच आपण या संदर्भातला निकाल देऊन, हा विषय मार्गी लावू."
या प्रकरणाच्या निकालासाठी उशीर होतोय का? या प्रश्नावर नार्वेकर म्हणाले, "विधानसभा अध्यक्ष हे एक घटनात्मक अधिकारपद आहे. न्यायालयाने या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. निश्चितच न्यायालयाचा मान हा राखला जाईल. अध्यक्षांची बाजू योग्यरित्या न्यायालयापुढे मांडली जाईल," असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
१३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान यु्क्तिवाद होऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. १३ ते २० ऑक्टोबरदरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर २० ऑक्टोबर रोजी सर्व कागदपत्रे एकत्र करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
याशिवाय २० ऑक्टोबरला दोन्ही गटाला अधिकचे काही कागदपत्रे द्यायची असतील, तर त्यासाठी त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. २७ ऑक्टोबरला दोन्ही गट आपलं म्हणणं मांडतील. ६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपले मुद्दे लिखित स्वरूपात सादर करतील. यानंतर त्यांना दावे-प्रतिदावे करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.