Rajasthan Political News : राजस्थानात मोदी-शाह 'धक्कातंत्र' वापरणार, काँग्रेसच्या नेत्यालाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करणार ?

Congress Vs BJP : विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे न आल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता...
Narendra Modi - Amit Shah
Narendra Modi - Amit Shah Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jaipur Politics : आगामी काळात होत असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. या पा्च राज्यांच्या निवडणुकांत भाजपप्रणित एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

या निवडणुकांमधील निकालाचे आगामी लोकसभा निवडणुकांवर मोठे परिणाम होणार आहेत. म्हणून भाजपने या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे न आल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे, तर काँग्रेसनं प्रचारात जोरदार आघाडी घेत भाजपला 'बॅकफूट'वर ढकलले आहे. पण राजस्थानात साइडलाइन केलेल्या वसुंधरा राजेंनाच अचानक मोदी - शाह पुढे आणणार की नेहमीच्या पद्धतीने 'धक्कातंत्र' वापरणार याविषयी चर्चांना उधाण आलं आहे.

Narendra Modi - Amit Shah
Rajasthan Politics : अशोक गेहलोतांच्या हाती हुकुमाचा एक्का ; भाजपाचा पराभव निश्चित?

राजस्थानचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी एकावेळी एकच सरकार येते. दुसऱ्यावेळी पुन्हा ते सरकार सत्तेत परत आलेले नाही. त्यामुळे आता भाजपचे सरकार सत्तेत येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतलेल्या प्रचारातील आघाडीमुळे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप(BJP) व काँग्रेसकडून प्रचार सुरू करण्यात आला असून, वेगळी रणनीती आखली जात आहे. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर सलग दुसऱ्यावेळी पुन्हा ते सरकार सत्तेत येत नाही. त्यामुळे यावेळेस राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची सत्ता जाईल, असा कयास बांधला जात होता. मात्र, गेहलोत यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या प्रभावी कामांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पायलटांवर भाजप टाकणार जाळं...

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट(Sachin Pilot) आणि विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू होती. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उभय नेत्यांमधील वाद शमिवण्यासाठी केंद्रातून प्रयत्न होताना दिसत आहेत, पण पायलटांसाठी भाजप जाळं टाकण्याची शक्यता आहे.

भाजपला पायलटांना गळाला लावण्यात यश आले, तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजप त्यांना पुढे आणू शकते. जर तसे झाले तर राजस्थानच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या गेहलोत- पायलटांमध्ये आगामी विधानसभा थेट लढत होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Narendra Modi - Amit Shah
Mahadev Jankar News : महादेव जानकर भडकले; म्हणाले, 'काँग्रेस-भाजप दोन्ही पक्ष गद्दार!'

सचिन पायलट काही काळापासून राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी आपली दावेदारी प्रबळ करत होते. तसेच ४५ वर्षीय सचिन पायलट हे गेहलोत यांची राज्याच्या राजकारणातील जागा घेण्यासाठी धडपडताना दिसत होते.

मात्र, काँग्रेसने त्यांच्या महत्त्वाकांक्षेला फार महत्त्व दिले नाही. २०२० मध्ये सचिन पायलट यांच्याकडे राज्याचे प्रदेशाध्यक्षपद आणि सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद होते. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंडखोरी केली. महिनाभर नाराजीनाट्य चालल्यानंतर अखेर पायलट यांचे बंड थंड झाले, पण त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आणि दोन्ही पदांवरून त्यांची गच्छंती झाली.

Narendra Modi - Amit Shah
Nashik BJP News : नाशिक मतदारसंघात भाजपने सुरू केली लोकसभा निवडणुकीची तयारी!

राजस्थानमध्ये १९५१ ते २०१८ भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झालेली आहे. असे असले तरी या कालावधीत अपक्ष उमेदवार कायमच किंगमेकर ठरत आले आहेत. १९५१ ते २०१८ या कालावधीतील एकूण १५ निवडणुकांत अपक्ष आमदार हे जिंकलेल्या जागांच्या बाबतीत आतापर्यंत नऊ वेळा तिसरा सर्वांत मोठा गट ठरलेले आहेत, तर मिळालेल्या मतांच्या बाबतीत अपक्षांचा गट एकूण १० वेळा तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे. येथे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांव्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी, सीपीआय (एम), राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, भारतीय ट्रायबल पार्टी, राष्ट्रीय लोकदल आदी पक्ष महत्त्वाची भूमिका निभावता आलेली नाही.

दरम्यान, राजस्थानमध्ये थेट काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होत असली, तरी निवडणुकीच्या निकालानंतर अपक्षांनाही तेवढेच महत्त्व असणार आहे. कारण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्षांची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi - Amit Shah
BJP-Thackeray Politics : बावनकुळेंचे आव्हान; उदयनिधी स्टॅलिनबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.