Mumbai News : महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची पहिली यादी जाहीर झाली आहे.त्यामुळे आता महायुतीतील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची नाराजी वाढली आहे.त्यांच्या बंडखोरी टाळण्यासाठी इच्छुकांची मनधरणीही सुरू आहे. काही जणांचं बंड शमवण्यात यश येत आहे तर काहीजणांचा अद्यापही लढण्याचा तोरा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत कुलाबा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे तेथील माजी आमदार राज पुरोहित हे चांगलेच नाराज झाले आहेत. महायुतीत कुलाबा मतदारसंघावरुन महायुतीत मोठं राजकारण तापलं आहे. तब्बल चार टर्म विधानसभेला या मतदारसंघाचं नेतृत्व केल्यानंतर यंदा या मतदारसंघावरुन मोठा पेच निर्माण झाला आहे.
माजी आमदार व नाराज भाजप (BJP) नेते राज पुरोहित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा होती.तसेच पुरोहित हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते.पण अखेर या भाजपमधील मुंबईतील पहिली बंडखोरी शमवण्यात यश आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश आले आहे. त्यांनी माजी आमदार राज पुरोहित यांची समजूत काढली आहे.कुलाबा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्याने पुरोहित नाराज होते.अखेर राज पुरोहित व राहुल नार्वेकर घेणार संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
भारतीय जनता पक्षाची पहिल्या यादीत पत्ता कट झालेल्या आणि 'वेटिंग'वर पडलेल्या इच्छुकांचे नाराजी नाट्य सुरू असून महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रिपदही भूषवलेल्या आमदारही भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती.
राज पुरोहित यांना कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मात्र त्यांच्या ऐवजी राहुल नार्वेकर यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पुरोहित हे नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. मात्र, फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. ही भेट सकारात्मक झाल्याचे माजी आमदार पुरोहित यांनी सांगितले.
भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले राहुल नार्वेकर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी मोठा दिलासा आहे. कारण राज पुरोहित यांचेही कुलाबा मतदारसंघावर मोठं वर्चस्व आहे. त्यांनी जवळपास या विधानसभा मतदारसंघाचे वीस वर्ष प्रतिनिधित्व केले आहे.पण पत्ता कट झाल्यानंतर पुरोहितांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती.
तसेच लवकरच शिवबंधन बांधणार असल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे भाजप उमेदवार नार्वेकरांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंं होतं. अखेर फडणवीसांनी मध्यस्थी करत ही पुरोहितांचं बंड शमवलं आहे. पण त्याचा नार्वेकरांना कितपत फायदा होतो हे निवडणुकीच्या निकालात कळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.