Advct. Ashish Shelar, Subhash Desai, Subhash Desai News Updates sarkarnama
मुंबई

रायगड 'सेझ'ची सुनावणी तीन महिन्यात पूर्ण करणार; उद्योग मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

महामुंबई सेझ Maha Mumbai Sez कंपनीसाठी उरण Uran, पेण Pen, पनवेल Panvel तालुक्यातील १५०४ हेक्टर जमीन शासनाने संपादीत केली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राजगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई 'सेझ'साठी संपादीत केलेल्या जमिनी शेतक-यांना परत करण्याबाबत जिल्हाधिका-यांकडे सुरू असलेली सुनावणी तीन महिन्यात पूर्ण करण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. (Raigad SEZ News updates)

महामुंबई सेझ कंपनीसाठी उरण, पेण, पनवेल तालुक्यातील १५०४ हेक्टर जमीन शासनाने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने सदरची जमीन शेतक-यांना परत करण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे. मात्र, त्याला विलंब होत असल्याकडे लक्ष वेधत आमदार ॲड. आशिष शेलार यांनी शासन सदर जमिनी परत करण्यास का विलंब करीत आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.

त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी सांगितले की, याबाबत जिल्हाधिका-यांकडे सुनावणी सुरू असून लवकरात लवकर ही कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. त्यावर ही सुनावणी कधी पूर्ण होणार असा प्रश्न आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्र्यांनी तीन महिन्यात सुनावणी पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या चर्चेत सहभागी होताना आमदार महेश बादली यांनी याबाबत स्थानिक लोकप्रतिनींची बैठक घ्यावी, अशी मागणीही केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT