आमदार दळवींवर दोन कोटींच्या खंडणीचा आरोप; रायगड जिल्ह्यात खळबळ!

शिवसेना आमदार महेंद्र दळवींवर दोन कोटींच्या खंडणीचा भाजप आमदार रवींद्र पाटलांकडून आरोप; ठेकेदाराच्या खुलाशाने चर्चेला तोंड फुटले.
Ravindra patil-mahendra Dalvi-
Ravindra patil-mahendra Dalvi-sarkarnama
Published on
Updated on

रायगड : पेण तालुक्यातील भाल गावातील सुरू असलेल्या खारबंदीस्त कामात अलिबाग-मुरुडचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी ठेकेदाराकडे 2 कोटींची खंडणी मागणी केल्याचा आरोप भाजपचे पेणचे आमदार रवींद्र पाटील (Ravindra patil) यांनी केला. त्याबाबतचा व्हिडीओही रायगड जिल्ह्यात व्हायरल झाला असून चर्चेला उधाण आले आहे. मात्र, संबंधित ठेकेदार प्रथमेश काकडे कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुनील पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी कोणतीही मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केलेली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे आमदार रवींद्र पाटील यांच्या दळवींवर केलेल्या आरोपाचा बूमरॅंग झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (BJP MLA accuses Shiv Sena MLA Mahendra Dalvi of ransom of Rs 2 crore)

पेण तालुक्यातील भाल येथे शेतात पाणी येऊ नये, यासाठी खारलँड विभागातर्फे खारबंदिस्त काम सुरू आहे. खारबंदीस्त काम हे प्रथमेश काकडे कन्स्ट्रक्शनतर्फे केले जात आहे. काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी काम बंद केले होते. या कामाची पाहणी करण्यासाठी पेणचे भाजप आमदार रवींद्र पाटील हे घटनास्थळी गेले होते. त्यावेळी अधिकारी आणि ग्रामस्थांसमोर आमदार पाटील यांनी ठेकेदाराकडे आमदार महेंद्र दळवी यांनी 2 कोटींची मागणी केल्याचे सांगितले. पेणच्या कामात अलिबागच्या आमदाराचा हस्तक्षेप कशाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

Ravindra patil-mahendra Dalvi-
दहिवडीच्या अपक्ष नगरसेवकाचे पुण्यातून अपहरण; पण देशमुखांनी अर्ध्या तासात डाव उलटवला!

यावेळी एका ग्रामस्थाने आमदार महेंद्र दळवी यांनी पैसे कधी मागितले, असा सवाल आमदार रवींद्र पाटील यांना विचारून जनतेची दिशाभूल करू नका, असे म्हटले आहे. आमदार रवींद्र पाटीलाच्या या व्यक्तव्याचा व्हिडीओ जिल्ह्यात व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत प्रथमेश काकडे कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुनील पाटील यांनी पेण येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र दळवी किंवा कोणत्याही शिवसैनिकाने पैशाची मागणी केली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे.

Ravindra patil-mahendra Dalvi-
मंचरचा पहिला नगराध्यक्ष होणार खुल्या गटाचा!

अशा बदनामीला भीक घालत नाही : आमदार दळवी

काहीजण शिवसेनेला बदनाम करण्याचे काम करून खोटे वृत्त प्रसिद्ध करीत आहेत. शिवसेना अशा बदनामीला भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com