Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray: देशात राजकीय भूकंप होणार? राहुल गांधी, संजय राऊतांनंतर आता राज ठाकरेही म्हणाले, "पुढच्या पाच महिन्यात..."

Raj Thackeray: विरोधकांकडून चालवला जाणारा आणि चर्चेत असलेला 'रिजीम चेंज' अर्थात सत्तापालट या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Amit Ujagare

Raj Thackeray: देशातील विविध मुद्द्यांवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांकडून चालवला जाणारा आणि चर्चेत असलेला 'रिजीम चेंज' अर्थात सत्तापालट या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. पुढच्या दोन-पाच महिन्यांत काहीतरी गडबड होईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर देशात पुन्हा मतपत्रिकांवरच मतदान व्हायला हवी अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

मतपत्रिकांवर निवडणुका घ्या

राज ठाकरे म्हणाले, "२०१८ पासून मी बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी करत आलो आहे. त्यासाठी मी अनेक राजकीय नेत्यांना भेटलो होतो, तसंच त्यावेळच्या निवडणूक आयुक्तांना दिल्लीला जाऊन मी हा विषय बोललो होतो. त्यावेळी मी काय बोललो हे कोणाला समजलं नव्हतं पण आता ते समजतंय. निवडणुकीत पारदर्शकता असायला हवी, ज्या व्यक्तीला मी मतदान करतो याचं समाधान मला मिळालं पाहिजे. मी त्याच व्यक्तीला मतदान केलं आहे, हे कळलं पाहिजे"

जर आपल्या आजुबाजूचे देश पाहिले तर लक्षात येईल की, सर्वच ठिकाणी मतपत्रिकांवर मतदान होत आहे. कुठेही मशिन्स वापरली जात नाहीत. अफ्रिकेशतील तीन-चार देश आहेत आणि त्यात भारतही आहे जिथं मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मशिन वापरली जातात. फ्रान्समध्ये केवळ एका व्यक्तीच्या तक्रारीवरुन तिथं इव्हीएम ही गोष्ट रद्द झाली आणि ते मतपत्रिकेवर आले. आख्ख जग मतपत्रिकेवर आहे तर मग भारतातच ईव्हीएम कशासाठी पाहिजेत, असा सवालही त्यांनी केला.

मतमोजणीला उशीर झाल्यास अडचण नाही - राज ठाकरे

विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम वापराचं कारण 'मतमोजणी लवकर होते' असं दिलं जातं. पण आम्हाला निकालच उशीरा मिळतो त्याचं काय करायचं मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन जर निकाल जाहीर व्हायला चार दिवस लागणार असतील तर घाई कोणाला आहे? १९९५च्या विधानसभा निवडणुकीत १२ फेब्रुवारीला मतदान झालं होतं आणि १२ मार्चला निकाल लागला होता. त्यामुळं काय फरक पडला? आताही लोकसभेच्या निवडणुका विविध टप्प्यात होतात आणि शेवटी निकाल काही दिवसांनीच लागतो, त्यामुळं त्याची अडचण असायचं कारण नाही, असा दाखलाही यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेला स्पष्टता यावी यासाठी केला.

पुढच्या पाच महिन्यात गडबड होईल - ठाकरे

"पुढच्या पाच महिन्यांत या देशात काहीतरी मोठी गडबड होईल, एवढं निश्चित" अशा शब्दांत राज ठाकरेंनी सध्या विरोधकांकडून सुरु असलेल्या रिजीम चेंजच्या मुद्द्यावर भाष्य केलं. मोदींच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा एप्स्टिनसोबतचा फोटो बाहेर आला आता यापुढे खूप गोष्टी बाहेर येणार आहेत, हे आता थांबणार नाही. सरकार चुकांवर चुका कर राहणार पण ही गोष्ट आता थांबणार नाही. पुढच्या काही महिन्यांत आख्खा देश रस्त्यावर आला तर मला आश्चर्य वाटणार नाही. येत्या काळात दुष्काळाची भीषण परिणाम दिसायला लागतील, यामध्ये अन्न-धान्याची टंचाई निर्माण होईल जे सरकारलाही झेपणारं नसेल. एवढंच होणार नाही पण इतरही अनेक गोष्टी होतील. याच पार्श्वभूमीवर मध्येच एखादी अशी वेळ येईल जेव्हा या देशाला पंतप्रधानाच नसेल, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

भाजप मागचे दिवस विसरलं का?

देशात अराजकता पसरवण्याचं काम सुरु आहे, या सरकारच्या आरोपाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, "शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज केला, पोलिसांच्या वेळात तुमच्या पक्षाचे लोक होते त्यात मुलांचा काहीच दोष नव्हता. भाजप मागचे दिवस विसरलं आहे का?" उद्यापासून त्याचं प्रदर्शन भरवा, अशी टिप्पणीही राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांकडं केली. तसंच खरी लोकशाही ही अमेरिकेत आहे आपल्याकडं नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT